रोजच्या साध्या भाजीपेक्षा त्याच भाजीला थोडा वेगळा मसाला, ग्रेवी करून वेगळी चव आणली की जेवण थोडे जास्त लज्जतदार होते. तर तसाच हा व्हेज कुर्मा प्रकार आहे. सुट्टी दिवशी नाष्टा कम जेवण म्हणून करायला मला आवडतो. कसा केला साहित्य व कृती-
साहित्य :-
* फ्लाॅवर १ बाऊल
* बटाटे २ मध्यम
* मटार अर्धा बाऊल
* कांदा १ मोठा
* टोमँटो २
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* खसखस १ टीस्पून
* तिळ २ टीस्पून
* गरम मसाला १ टीस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* सुकं खोबरं पाव वाटी
* मीठ चविनुसार
* तेल
* फोडणीसाठी मोहरी,जीरे, हींग हळद
कृती :-
प्रथम भाज्या मोठ्या आकारात कापून अर्धवट शिजवून घ्याव्यात.
प्रथम भाज्या मोठ्या आकारात कापून अर्धवट शिजवून घ्याव्यात.
आता आधी तिळ,खसखस व सुके खोबरे वेगवेगळे भाजावे.नंतर त्याच पँनमधे थोडे तेल घालून कांदा परतावा. सर्व साहित्य थंड झाले की, मिक्सर मधून वाटून घ्यावे.
नंतर पँनमधे तेल गरम करून त्यामधे मोहरी,जीरे तडतडवून फोडणी करावी. त्यामधे आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट व वाटलेला मिश्रणाचा गोळा घालावा व थोडे परतावे. आता त्यात तिखट,मीठ, गरम मसाला व आधीच अर्धवट शिजवलेल्या भाज्या घालून थोडे पाणी घालावे व एक उकळी आणावी ग्रेवी दाटसरच ठेवावी.
आपला गरमा-गरम व्हेज कुर्मा तयार आहे. पुरीसोबत खायला द्या. आवडत असेल तर सोबत लिंबू व कांदा द्यावा.
टीप :
* आपल्या आवडीनुसार किंवा उपलब्ध असतील त्या भाज्या घ्याव्यात.
* भाज्या तेलात तळून काढण्याची पण पध्दत आहे. परंतु मला वाफलेल्या आवडतात म्हणून वाफवून घेतल्या.
* आपल्या आवडीनुसार किंवा उपलब्ध असतील त्या भाज्या घ्याव्यात.
* भाज्या तेलात तळून काढण्याची पण पध्दत आहे. परंतु मला वाफलेल्या आवडतात म्हणून वाफवून घेतल्या.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment