20 July 2018

चटपटीत काँर्न क्रिस्पी ( Corn Crispy)

No comments :
थंड पावसाळी हवेत कांहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. तेव्हा पट्कन करण्यास हा प्रकार मला आवडतो. स्वीट काँर्नचे चाटआपण नेहमी करतो. तर हा थोडा चटपटीत वेगळा, कमी साहीत्यात होणारा पदार्थ आहे.कसा करायचा साहित्य व कृती-
साहित्य :- 

* स्वीट काँर्न दाणे १ कप
* काँर्नफ्लोअर २ टेस्पून
* मीठ चवीनुसार
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* मिरपूड पाव टीस्पून
* चाट मसाला पाव टीस्पून
* तेल तळण्यासाठी
* कोथंबिर, लिंबू

कृती :-
प्रथम मक्याचे दाणे, स्वीट काँर्न गरम पाण्यात मीठ घालून पांच मिनिट वाफवून घ्यावेत. वाफल्यानंतर चाळणीवर काढून गार होऊ द्यावे.

आता वाफवलेल्या गार दाण्यावर काँर्नफ्लोअर, मिरची पूड घालावी व सर्व दाणे एकत्र हलवून काँर्नफ्लोअर मधे लपेटून घ्यावे.पाणी घालू नये. काँर्नफ्लोअर कोरडे तळाला राहीलेय असे दिसले तर किंचित पाणी शिंपडावे.अन्यथा नको.


आता मसाला लपेटलेले दाणे तेल गरम करून त्यामधे मंद आचेवर खरपूस तळून टिश्यू पेपरवर काढावेत.
सर्व तळून झाल्यावर एका बाऊलमधे घेऊन त्यावर चाटमसाला,मिरपूड घालून एकत्र करावे. 

खायला देताना वरून लिंबू पिळावे व कोथंबिर घालावी.
चटपटीत, कुरकूरीत असे हे काँर्न संध्याकाळच्या वेळी तोंडात टाकायला खूप छान लागते.

टिप :
* तळताना सुरवातीला मंद आचेवरच तळावे व नंतर आंच थोडी मोठी करावी. सुरवातालाच खूप गरम तेलात,मोठ्याआचेवर दाणे तेलात फुटतात व तेल उडते.  यातून खबरदारी म्हणून वर अर्धवट ताट झाकून तळावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment