मेतकूट हा पदार्थ पारंपारिक मराठी पदार्थ आहे. पानातील डाव्या बाजूचा तोंडीलावणेचा पदार्थ म्हणता येईल. मराठी ब्राम्हण समाजात जास्त केला जातो. साधारणपणे पावसाळ्याच्या आधि पावसाळी तयारी म्हणून लोणची , पापड, मसाले व मेतकूट हे पदार्थ करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात मस्त गरमा गरम मऊ गुरगूटा भात त्यावर साजूक तूप मेतकूट सोबत एखादी लिंबू लोणच्याची फोड अ.हा..ह..! अतिशय चविष्ट लागते.किवा नुकतेच अन्न खायला शिकणार्या लहान मुलाना द्यायला उत्कृष्ट प्रकार आहे.कसा करावा पहा.
साहीत्य :-
* हरभरा डाळ १ वाटी
* उडद डाळ अर्धी वाटी
* तांदुळ पाव वाटी
* मेथी १/४ टीस्पून (ऐच्छिक)
* मोहरी १ टीस्पून
* धणे २ टीस्पून
* जीरे २ टीस्पून
* लवंगा ४ नग
* दालचिनी एक इंच
* काळी मिरी २-३
* लहान वेलची ३-४
* मोठी वेलची १-२
* सुंठ एक इंच
* हळद व लाल मिरची पावडर एक टीस्पून ऐच्छिक
* हींग १० ग्रॅम
* उडद डाळ अर्धी वाटी
* तांदुळ पाव वाटी
* मेथी १/४ टीस्पून (ऐच्छिक)
* मोहरी १ टीस्पून
* धणे २ टीस्पून
* जीरे २ टीस्पून
* लवंगा ४ नग
* दालचिनी एक इंच
* काळी मिरी २-३
* लहान वेलची ३-४
* मोठी वेलची १-२
* सुंठ एक इंच
* हळद व लाल मिरची पावडर एक टीस्पून ऐच्छिक
* हींग १० ग्रॅम
कृती :-
प्रथम मंद आचेवर डाळी,तांदुळ तांबूस गुलाबी कोरडेच भाजून घ्यावे.
नंतर मेथी,धणे व जीरे खमंग भाजून घ्यावे. मोहरी साधारण गरम करावी. बाकीच्या वस्तू लवंग मीरे,वेलदोडे इ.सर्व कच्चेच ठेवले तरी चालते .फक्त दळण्यासाठी कडक असावेत म्हणून गरम करावे.
आता आधी डाळी,तांदुळ मिक्सरवर बारिक करा.चाळून घ्या.
नंतर मसाल्याचे सर्व पदार्थ एकत्र करून बारिक करावेत व नीट चाळून घ्यावेत.
आता सर्व कुटलेले मसाले,हळद ,हींग व मिरची पूड व वरील कुटलेल्या डाळी सर्व एकत्र मिसळावे. नीट हलवून २-३ वेळा चाळावे.
मेतकूट तयार ! तयार म कोरड्या व हवाबंद बरणीत भरून ठेवा.भरतान त्यात हींगाचा एक खडा मधे पुरून ठेवा.हींगाचा छान वास लागतो.
असे तयार मेतकूट गरमा-गरम गुरगूट्या भाता सोबत तर खाता येतेच पण दह्यात कालवून पण चटणी सारखे वाढता येते. तसेच भडंगात ,पोह्यात , डोश्यावर पसरून,भाजक्या ब्रेडला तूप लावून त्यावर पण पसरवता येते.नुसत्या चिरमूरे व लाह्याना पण तूप मेतकूट लावून खाल्ले तर छान लागते.
मराठवाड्याकडे एक ' येसर मेतकूट' पदार्थ केला जातो.त्यात पण या मेतकूटासारखेच सर्व पदार्थ असतात. पण त्यात अजून ज्वारी बाजरी ,तमालपत्र सुके खोबरे असे अजून काही मसाले पदार्थ असतात व तयार असलेले हे येसर ऐनवेळी चमचाभर घेऊन ,पाण्यात कालवून फोडणीला टाकून त्याची आमटी केली जाते.
टीप- असे अगदी कमी प्रमाणात करायचे असेल तर एखादेवेळी डाळी, तांदूळ नाही धुतले तरी चालते. परंतु जास्त प्रमाणात करायचे असेल तर डाळ,तांदुळ जरूर धुवून, पंख्याखाली सुकवून नंतर भाजाव्यात.
टीप- असे अगदी कमी प्रमाणात करायचे असेल तर एखादेवेळी डाळी, तांदूळ नाही धुतले तरी चालते. परंतु जास्त प्रमाणात करायचे असेल तर डाळ,तांदुळ जरूर धुवून, पंख्याखाली सुकवून नंतर भाजाव्यात.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment