काही वेळा गणपती ,नवरात्र असे काही सण उत्सवअसेल तर प्रसाद म्हणून आलेली ,किवा उपवास म्हणून आणलेली बरीच केळी जमा होतात.आणि ती काही लगेच संपत पण नाहीत. मऊ व काळी होतात.तर कोणीच खायलापण तयार नसते.ती तशीच पङून वाया जाते. मग त्यांचे काय करावे ? असा प्रश्न पडतो. फेकून देणेही होत नाही व खाल्लेहीजात नाही . अशावेळी मग त्याच्या खाली सांगितल्याप्रमाणे पुर्या कराव्यात.खूप सुंदर लागतात. विश्वास बसत नसेल तर खाली संगीत्यल्याप्रमाणे करून बघा . एकदम सोप्या व झटपट होतात .
साहित्य:-
1) पिकलेली दोन केळी
2) कणिक आवशक्यतेप्रमाणे अंदाजे २-३ वाट्या लागते
3) वेलचीपूङ
4) तेल तळणीसाठी
5) पिठीसाखर दोन टे.स्पून
2) कणिक आवशक्यतेप्रमाणे अंदाजे २-३ वाट्या लागते
3) वेलचीपूङ
4) तेल तळणीसाठी
5) पिठीसाखर दोन टे.स्पून
कृति:-
केळ एका बाऊलमधे घेऊन कुस्करावे .त्यामधे मावेल एवढीच कणिक घाला. साखर व वेलचीपूङ घाला .सर्व साहीत्य नीट एकत्र करून घट्ट गोळा तयार करावा.पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवा.
नंतर तयार पिठाच्या लहान लहान पुर्या लाटून तेलात मंद आचेवर गुलाबी तळाव्यात.
No comments :
Post a Comment