नेहमी नेहमी डाळ-भात खाऊन कंटाळा येतो. किंवा रात्रीच्या जेवणात फारशी भूक नसते पण थोडेफार खाण्याची इच्छा असते. अशावेळी भाजी,भात एकच डिश करून वन डिश मील म्हणून हा भात करावा. साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* चिरलेले पालक मोठ्या २ वाट्या
* तांदुळ २ वाटी
* आलं-लसूण, मिरची पेस्ट १ टीस्पून
* लवंगा ४,दालचिनी ३-४ तूकडे
* तमालपत्रं, जीरे
* गरम मसाला १ टीस्पून*मटार /शिमला मिरची /ड्रायफ्रूट्स (ऐच्छीक)
* मीठ चविनूसार
* तेल किवा बटर
कृती :-
प्रथम पालक गरम पाण्यात ब्लांच करून घ्यावे. थंड होऊ द्या. नंतर मिक्सरमधे पेस्ट करा.
तोपर्यत भात कुकरला मोकळा शिजवून घ्या. शिजवतानाच मीठ चविनूसार घाला. थंड होऊ द्या.
आता पॅनमधे तेल गरम करा व त्यामधे जीरे व लवंग, दालचिनी, तमालपत्रं घाला.मिरची,आलं-लसूण पेस्ट घाला. आताच मटार किंवा ड्रायफ्रूट्स जे असेल घेतलेले ते घाला. त्यावर तयार पालक पेस्ट घालून थोडे परता. आताच गरम मसालाही घाला.
शेवटी शिजवून थंड केलेला भात घाला. व्यवस्थित सर्व हलवून एक वाफ येऊ द्या.
गरम भात आवडत असेल तर,पापड, लोणचे किया दही घेऊन खा.
टीप - आपल्या आवडीनुसार गाजर, मटार, बटाटा यातील एखादी भाजी घातली तरी छान लागती. मी मटार घातले.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.