संक्रांत, भोगी म्हटले की, गुळपोळी, तिळ-गुळाच्या वड्या, तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी असे पदार्थ केले जातात. हे उष्ण पदार्थ असतात. तिळामधे शरीराला आवश्यक स्निग्धांश असतात. यांच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते. म्हणून थंडी मधेे असे पदार्थ केले जातात. तिळाच्या पारंपारिक मऊ वड्या, लाडू आपण करतोच. आज मी तिळाच्या कुरकुरीत वड्या केल्या. अगदी कमीत-कमी व मोजके साहित्य लागते व पट्कन होतात. कशा केल्या साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* तिळ १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १ टीस्पून
* वेलचीपूङ ऐच्छिक
* काजू, बदाम काप ऐच्छिक
* तिळ १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १ टीस्पून
* वेलचीपूङ ऐच्छिक
* काजू, बदाम काप ऐच्छिक
कृती :-
प्रथम तिळ स्वच्छ निवडून चाळून ध्यावेत. पोळपाट- लाटण्याला तूपाचा हात चोळून घ्यावा.
प्रथम तिळ स्वच्छ निवडून चाळून ध्यावेत. पोळपाट- लाटण्याला तूपाचा हात चोळून घ्यावा.
प्रार्थमिक तयारी केल्यावर आता गँसवर कढई ठेवून मंद आचेवर तिळ भाजून घ्यावेत. जास्त भाजू नयेत.,कडू लागतात.
आता तिळ ताटात काढून त्याच कढई मध्ये तूप घालावे व तूप पातळ झाले साखर घालावी. मंद आचेवरच साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे. साखर विरघळली की,गँस बंद करून लगेच भाजलेले तिळ, ड्रायफ्रूट्सचे पातळ काप घालावेत व सर्व साहित्य झटपट एकत्र करावे.
आता मिश्रणाचा तयार गोळा तूप लावलेल्या पोळपाटावर काढावा व गरम असतानाच हवे त्या जाडीची (शक्यतो पातळच) पोळी लाटावी. चाकूने रेषा पाडाव्यात. ही वडी लगेचच सुकते. म्हणून सर्व कृती झटपट करावी.
आता मस्त कुरकुरीत वड्या काढाव्यात व हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. महीनाभर सुध्दा छान कुरकुरीत रहातात.
तुम्हीही अशा पध्दतीने वड्या करून बघा. नक्की आवडतील.
टिप :
* तिळ तांबूस रंगाचे वापरावेत. पांढरे पाँलीशचे नको. तांबूस तिळ चविला अधिक खमंग असतात. मी तेच वापरलेत.
* तिळ तांबूस रंगाचे वापरावेत. पांढरे पाँलीशचे नको. तांबूस तिळ चविला अधिक खमंग असतात. मी तेच वापरलेत.
* साखरे ऐवजी गुळ वापरला तरी चालतो. परंतु गुळ नुसता विरघळून न घेता त्याचा गोळीबंद पाक करावा.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment