कलिंगड हे एक वेलवर्गीय फळ आहे. यामधे 92% पाणी असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरातिल पाण्याची पातळीसमतोल रहाण्यास मदत होते. ऊन्हाळ्यात आवर्जून खावे. यामधे व्हिटामिन 'ए' व ' सी ' मुबलक असते.तसेच उच्च रक्तदाब , ह्रदयरोग ,कॅन्सर या आजाराना काही प्रमाणात दूर ठेवण्यासही मदत करते. कलिंगडाच्या सेवनाने कॅलरीज् वाढत नाहीत. अशा या बहुगूणी फळाचे अजून बरेच काही फायदे व उपयोग आहेत. कोणतेही फळ शक्यतो चिरूनच खावे. परंतू काहीवेळा वृध्द,लहान आजारी माणसांना रस काढून देणे आवश्यक असते .तर कसा काढावा ते पहा -
* प्रथम कलिंगड चिरून त्यातील बिया काढून लहान फोडी करून घ्या. फोडी करताना त्यातील फक्त लाल भागच घ्यावा.रस पण छान लाल व गोड होतो.
* नंतर मिक्सर किंवा ब्लेडरमधे पाणी न घालता फोडी घुसळाव्यात. घुसळताना त्यामधे एक-दोन टेस्पून गुलकंद घालावा .म्हणजे गोडीपण वाढते व उन्हाळ्यात गुलकंद थंड असतो शरीराला.
* नंतर तयार रस मोठ्या गाळणीतून गाळून घ्यावा व त्यामधे आवडीप्रमाणे सैधव मीठ व चाट मसाला घालावा.
* आता छानश्या ग्लासमधे घालून सजावटीला वरून पुदीन्याची पाने ,एखाद दुसरा कलिंगडाचा लहान तुकडा व आईसक्यूब घालून सर्व्ह करा.
टीप :- या ज्यूसमधे आपण बरीच विविधता आणू शकतो. गुलकंदा ऐवजी पुदीन्याची पाने , तर कधी तुळशी , रूहअब्जा कधी लिंबू पिळावे.
जर बर्फ चालत नसेल तर आधीच कलिंगड चिरून गार होण्यासाठी फ्रिजमधे ठेवावे.नंतर रस काढा.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment