Showing posts with label Misc.Kitchen Tips. Show all posts
Showing posts with label Misc.Kitchen Tips. Show all posts

29 October 2017

स्वयंपाक घर, घराचा आत्मा

No comments :

'स्वयंपाक घर' हा घराचा आत्मा असतो. स्वयंपाक घर म्हणजे पवित्र महायज्ञाची तयारी जिथे केली जाते ती जागा. कारण उदरभरण म्हणजे ते नुसते पोट भरणे नसते तर ते एक यज्ञकर्म करणे समजले जाते व अशा उदरभरणाची सोय जिथे केली जाते ती जागा म्हणजे यजाची पवित्र जागा, स्वयंपाक घर होय! व या ठिकाणी सर्व काम पवित्र रीतीनेच केले पाहीजे. तसेच चौसष्ट कला पैकी पाककला एक उच्च दर्जाची कला समजली जाते. चविष्ट व पौष्टीक पदार्थ करणे ही एक पाक कला आहे व स्वयंपाक घर एक कला दालन आहे . तर अशा कला दालनामधे वावरताना प्रत्येकाने पाळावित अशी कांही पत्थे व करण्यायोग्य सोप्या गोष्टी.

• स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ असावे. नियमित साफ-सफाई झाली पाहीजे.

• ‎स्वयंपाक घरात प्रवेश करण्याआधी शुचिर्भुत होऊन, सुती व काम करण्यास सोईचे स्वच्छ कपडे परिधान करावेत.

• ‎केस व्यवस्थित एकत्र वर बांधलेले असावेत.

• ‎नेहमी आधी साबणाने हात स्वच्छ धुवूनच मग कामाला सुरवात करावी.

• ‎स्वयंपाकात लागणारे डाळी, तांदुळ, कडधान्ये नेहमी साफ करून ठेवावीत. पीठं चाळून ठेवावीत. शेंगदाणे भाजून कुटून ठेवावेत. रवा भाजून ठेवावा. पोहे चाळून ठेवावेत.

• ‎स्वयंपाकात लागणारे मसाले तीन किंवा सहा महिन्याचेच करावेत. अशाने त्यांचे स्वाद कमी होत नाहीत. पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो.

• ‎आधीचे पदार्थ आधी वापरावेत. ते जास्त जूने  होऊ देऊ नयेत.

• ‎गवार, घेवडा, मटार सारख्या भाज्या आधीच निवडून, मोडून फ्रीजमधे ठेवाव्यात. पालेभाज्या, कोथिंबीर निवडून ठेवावे. आलं-लसूण पेस्ट तयार करून ठेवावी. ऐनवेळी घाई  गडबड होत नाही.

• ‎भाज्या चिरण्याआधी धुवून घ्याव्यात. चिरल्यावर नाही.

• ‎जो पदार्थ करणार आहोत त्याची आधी पुर्वतयारी करून घ्यावी. नंतरच गँस पेटवून सुरवात करावी. म्हणजे त्या पदार्थाला आवश्यक एखादा पदार्थ नसेल तर पर्यायी सोय करता येते व पदार्थ नीट बनतो. तसेच गँसचीपण बचत होते.

• ‎तयार अन्नपदार्थ नेहमी व्यवस्थित झाकून ठेवावेत.

• आपल्या ‎गरजे इतकेच अन्न पदार्थ तयार करावेत. आजच्या काळात ऐनवेळी कोणीही कोणाकडे जात-येत नाही.

• ‎शक्यतो शिळे अन्न शिल्लक राहूच नये परंतु कांही कारणाने कधी शिल्लक राहीलेच तर लवकरात लवकर त्याचा कांही नविन पदार्थ करून घरातल्या सर्वानी वाटून खाऊन संपवावा. वाया घालवू नये.

• ‎कुठे वाचलेला, खाल्लेला अथवा आवडलेला एखादा नवीन पदार्थ करून पहायचा असेल तर, आधी त्याचा पुर्ण अभ्यास करावा. लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे याची एकदा खात्री करावी. एखादी वस्तू नसेल तर आधीच आणवून घ्यावी व नंतरच शांतचित्ताने प्रयोगाला सुरवात करावी. म्हणजे पदार्थ सहसा फसत नाही.

• ‎नवीन पदार्थ करताना सुरवातीला अगदी कमीत-कमी प्रमाणात साहित्य घेऊन लहान प्रमाणात पदार्थ बनवावा. चुकून बिघडलाच तर फार वाया जात नाही. आवडला तर आणखी बनवता येते.

• ‎स्वयंपाक घरात नेहमी एखादे पेन व कागद छोट्या पँडला लावून लटकवून ठेवावे. एखादा पदार्थ संपला तर लगेच लिहून ठेवावे. म्हणजे बाजारातून सामान आणताना सर्व वस्तू न विसरता घरी येतात व ऐनवेळची धावपळ वाचते.

• स्वयंपाक घर ‎आपल्या कुवतीनुसार सर्व आवश्यक त्या जुन्या व अत्याधुनिक साधनानी म्हणजे भांडी, चमचे, पँन, कढई, तवे, मिक्सर, ब्लेडर इत्यादि.. नी सुसज्ज ठेवावे व पदार्थ तयार करताना योग्यवेळी योग्य ती साधने आळस न करता वापरावित. पदार्थ अधिक रूचकर व लवकर होतो.  उदा. शेंगदाण्याची लसूण घातलेली चटणी जुन्या पध्दतिने बिडाच्या खलबत्त्यात कुटली तर अधिक रूचकर लागते.. तेच धण्या -जिर्याची पावडर मिक्सरमधे चांगली बारीक होते.

• ‎सर्वात शेवटी महत्वाचे, स्वयंपाक करताना आनंदी वृत्तीने, मनापासून करावा. पदार्थ अधिक चवदार व चांगला होतो. आदळाआपट करत चिडचिड्या वृत्तीने कधीच करू नये. हा अन्न देवतेचा अपमान असतो. व असे अन्न घरातल्या खाणार्याच्या कधीच अंगी लागत नाही व समाधानही मिळत नाही. बरकत रहात नाही.

एकूणच फक्त पदार्थ करता येणे म्हणजे 'सुगरण' नव्हे तर त्या जोडीला स्वच्छता, नियोजन, बचत, शास्त्र अशा सर्व कला तिला अवगत असाव्यात तरच अशा सुगरणीला अन्नपुर्णा देविचा वरदहस्त लाभतो.

आपण जे काम करतो ते मनापासून व आनंदाने करावे. पुर्ण क्षमतेने करावे. स्वतालाही आनंद मिळतो व समोरच्यालाही मिळतो.

धन्यवाद 🙏
स्वादान्न




19 May 2015

कलिंगड ज्यूस (Watermelon Juice )

No comments :

कलिंगड हे एक वेलवर्गीय फळ आहे. यामधे 92% पाणी असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरातिल पाण्याची पातळीसमतोल रहाण्यास मदत होते. ऊन्हाळ्यात आवर्जून खावे. यामधे व्हिटामिन 'ए' व ' सी ' मुबलक असते.तसेच उच्च रक्तदाब , ह्रदयरोग ,कॅन्सर या आजाराना काही प्रमाणात दूर ठेवण्यासही मदत करते. कलिंगडाच्या सेवनाने कॅलरीज् वाढत नाहीत. अशा या बहुगूणी फळाचे अजून बरेच काही फायदे व उपयोग आहेत. कोणतेही फळ शक्यतो चिरूनच खावे. परंतू काहीवेळा वृध्द,लहान आजारी माणसांना रस काढून देणे आवश्यक असते .तर कसा काढावा ते पहा -

* प्रथम कलिंगड चिरून त्यातील बिया काढून  लहान फोडी करून घ्या. फोडी करताना त्यातील फक्त  लाल भागच घ्यावा.रस पण छान लाल व गोड होतो.

* नंतर मिक्सर किंवा ब्लेडरमधे पाणी न घालता फोडी घुसळाव्यात. घुसळताना त्यामधे एक-दोन टेस्पून गुलकंद घालावा .म्हणजे गोडीपण वाढते व उन्हाळ्यात गुलकंद थंड असतो शरीराला.

* नंतर तयार रस मोठ्या गाळणीतून गाळून घ्यावा व त्यामधे आवडीप्रमाणे सैधव मीठ व चाट मसाला घालावा.

* आता छानश्या ग्लासमधे घालून सजावटीला वरून पुदीन्याची पाने ,एखाद दुसरा कलिंगडाचा लहान तुकडा व आईसक्यूब घालून सर्व्ह करा.

टीप :- या ज्यूसमधे आपण बरीच विविधता आणू  शकतो. गुलकंदा ऐवजी पुदीन्याची पाने , तर कधी तुळशी , रूहअब्जा कधी लिंबू पिळावे.

जर बर्फ चालत नसेल तर आधीच कलिंगड चिरून गार होण्यासाठी फ्रिजमधे ठेवावे.नंतर रस काढा.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

16 May 2015

व्हेजिटेबल स्टाॅक (Vegetable Stock)

No comments :

बरेच वेळा असे होते आपल्याला भाजीचे सूप करायचे असते. पण सर्वच भाज्या घरात ऐनवेळी उपलब्ध असतील असे नाही. मग भाज्या आणून सूप करणे म्हणजे कटकटीचे व किचकट काम वाटते.म्हणून हा स्टाॅक तयार असेल तर आपण कोणतीही उपलब्ध भाजी घालून सूप पट्कन तयार करू शकतो.. तर स्टाॅक म्हणजे सर्व भाज्या शिजवून त्यांचा काढलेला अर्क ! तर कसा करायचा पहा.

साहीत्य :-

1) कोबी,सिमला मिरची,गाजर,फ्लाॅवर,मटार ,लाल भोपळा या सर्व किवा आपल्या आवडीच्या अजून काही भाज्या मिळून 500 ग्रॅम
2) कांदा एक
3) लसूण 3-4 पाकळ्या
4) आले एक इंच
5) मिरे 8-10
6) तमालपत्र दोन लहान पाने
7) लवंगा 3-4
8) पाणी दोन लिटर

कृती :-

      सर्वात आधि  पाणी गॅसवर गरम करायला ठेवावे. त्यामधे वरील सर्व मसाला टाका. पाणी गरम होईपर्यंत वरील सर्व भाज्या मोठ्या-मोठ्या कापून एक एक करून गरम पाण्यात टाका.

सर्व भाज्या पाण्यात 25-30 मिनिटे चांगल्या उकळू द्याव्यात.

नंतर सर्व भाज्या तशाच थंड होऊ द्याव्यात. गार झाल्यावर मोठ्या गाळणीतून सर्व भाज्या गाळाव्यात. आता जो अर्क निघाला आहे तो एका बाटलीमधे भरून फ्रिजमधे ठेवावा. जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरा.कोणत्याही भाजीचे झटपट सूप तयार करता येते.आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून व स्टाॅक वापरून विविध प्रकारची सूप्स तयार करता येतात.

हा स्टाॅक 8-10 दिवस आरामात टिकू शकतो. जास्तच रहातो पण शक्यतो आठ आठ दिवसांचा करून ठेवावा.

टीप :- भाज्या गाळून घेतल्यावर वर ज्या भाज्या रहातात त्या सत्वविरहीत असतात पण टाकायचे नसेल तर त्यात आणखी थोड्या भाज्या वापरून पावभाजी ,कटलेट किवा मॅश करून थोडे गहूपीठ वापरून पराठे बनवू शकतो.

  आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

27 March 2015

कोल्हापूरी कांदा-लसूण चटणी/मसाला(Kolhapuri Chuteny/Masala)

No comments :
कोल्हापूरी मसाला चटणी ही सांगली, कराड, सातारा, कोल्हापूर या भागात विशेष करून स्वयंपाकात वापरतात.उन्हाळी कामातले हे एक कामच असते . एकदम वर्ष -सहा महीन्याची करून ठेवली की रोजचा स्वयंपाक करणे सोईचे व झटपट होते. सर्व भाज्या ,आमटी यामधे वापरली जाते.तसेच नुसती सुध्दा तेल घालून भाकरी सोबत खायला चांगली लागते.एखादा लहान कांदा, ही घेतला तर आणखी मजा येते जेवणाला. भाजीची आठवणही नाही येत. ही मसाला चटणी करणे मोठे कष्टदायक काम आहे.पण घरी बनवलेली चव काही न्यारीच असते. मग त्यात आपण एक शाॅर्टकट वापरू शकतो. अगदी मिरच्या आणणे, वाळविणे, कुटणे व मिरची पूड करणे,व नंतर पुढे मसाला करणे .या महाकष्टमय कामापेक्षा मिरचीपूड तयार आणावी व बाकी सर्व गरम मसाले,ओला मसाला घरी आणून मग चटणी करावी. लवकर होते.शहरी भागात रहात असू तर मिरच्या आणणे व वाळवणे जिकीरीचे होते.माझ्या घरी स्वयंपाकात गोडा मसाला वेगळा व लाल मिरचीपूड वेगळी असे वापरण्याचीच पध्दत आहे.पण काही भाज्यामधे म्हणजे भरले वांगे,दोडका अशा भाज्याना हाच मसाला छान लागतो. मग मी घरीच मिक्सरवर गोडा मसाला म्हणजे त्यात सर्व गरम मसाले येतातच अधिक मिरची पूड व ओला मसाला कांदा,लसूण,आले व कोथंबिर असे सर्व धेऊन कुटून थोडासा करून ठेवते.व नुसता ही खायला भाकरी,चपाती सोबत  सर्वाना आवडतोच ! चला तर मग हा झटपट मसाला कसा करायचा पाहू !

साहीत्य :-

* लाल मिरचीपावडर १ किलो
* बारीक मीठ २५० ग्रँम
* कांदा उभा पातळ चिरून १किलो
* लसूण १००ग्रँम
* आलं १००ग्रँम
* कोथिंबिर १ जूडी निवडून
* गोडा मसाला ५०० ग्रँम
गोडा मसाला कृती या लिंकवर पहा 👇
http://swadanna.blogspot.in/2015/12/goda-masala.html?m=1

कृती :-

प्रथम कांदा तेलावर भाजून घ्या. आलं-लसूण कुटून घ्या. थंड होऊ द्या. कोथिंबिर चिरून घ्या.

आता मिक्सरमधे कांदा,आलं-लसूण व कोथिंबिर थोडे मीठ घालून एकत्र वाटून घ्या.

नंतर मिरचीपावडर व तयार गोडा मसाला एका मोठ्या परातीमधे घ्या. मोठ्या चमच्याने एकत्र करा. त्यामधे वरील वाटलेला मसाला घाला व हाताने सर्व एकत्र मिसळा.

शेवटी परत एकदा सर्व एकत्रित केलेला मसाला थोडा -थोडा मिक्सरमधे फिरवून काढा. म्हणजे व्यवस्थित एकजीव होतो.

आपली झटपट कोल्हापूरी मसाला चटणी तयार!

तयार मसाला स्वच्छ कोरड्या बरणीत भरून ठेवा.नुसता सुध्दा तेल घालून भाकरीसोबत  खायला छान लागतो.भाजी-आमटीची चव तर अप्रतीम लागते.तुम्हीही नक्की करून बघा !

टीप:
मी वर्षभराच्या हिशेबाने मापे दिलीत. परंतु मिरचीपूड व गोडा मसाला वेगवेगळा तयार असेल तर २-३ महीन्यातून थोडी -थोडी ताजी तयार करा. चव चांगली लागते. मसाले वेगवेगळे ठेवल्याने, ज्यांचे घरी कांदा लसूण सर्वच भाज्यामधे घालत नाहीत त्यानाही सोईचे होते.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

27 January 2015

मैद्याचे दुष्परीणाम

No comments :

आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक पदार्थ हा चोथायुक्तच असला पाहिजे यावर भर दिला जातो. गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा.

मैदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही. परंतु मद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मदा वापरतात. उदा - बिस्किट्स नानकटाई, पाव, खारी, ब्रेड, टोस्ट, समोसा, पॅटीस, शंकरपाळे, करंज्या, रोटी, नान, नूडल्स, केक हे सर्वच पदार्थ मद्यापासून बनविले जातात आणि हे पदार्थ लहान मुलांपासून गृहिणी ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडतात.

मैदा बनविण्याची प्रक्रिया : गव्हाला थोडे पाणी लावून दळल्यावर त्यातील चोथा बाजूला करून अगदी मऊ असे पीठ शिल्लक राहते त्यालाच मैदा असे म्हणतात. हा मैदा अगदी पांढरा शुभ्र दिसण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. तो मैदा जास्त दिवस टिकण्यासाठी परिरक्षकांचा (Preservative) वापर केला जातो. त्यामुळे तो आरोग्यास हानिकारक होतो. या सर्व प्रक्रियांमुळे गव्हाच्या सालीमधील ‘ड’ जीवनसत्व, खनिज द्रव्ये, स्निग्ध पदार्थ काढून टाकले जातात. गव्हामधील सर्व ९८ टक्के पौष्टिक सत्वयुक्त घटक नष्ट होतात व उरलेले पांढरे पीठ म्हणजेच मैदा होय.

गुणधर्म खनिजद्रव्ये, ‘ड’, ‘ई’ जीवनसत्वे, क्षार यांचा अभाव मद्यामध्ये असतो. मद्यांमध्ये फक्त काबरेहायड्रेट्स, जास्त प्रमाणात असतात व त्यातून शरीराला फक्त उष्मांक (कॅलरिज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मद्यापासून बनविलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर अनेक आजारांचे माहेर घर होते. कारण शरीराचे पोषण न होता फक्त वजन वाढत राहते. सध्या त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा हा आजार आढळून येतो. कारण, नूडल्स, केक, बिस्किट्स अशा प्रकारचे पदार्थ मुलांना फार आवडतात. सध्याच्या काळात आईलाही घरगुती पदार्थ बनविण्यास वेळ न मिळाल्यामुळे तीही मुलांना आवडीने हे पदार्थ खाऊ घालते.

मैदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतडय़ामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टंभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हेही आजार वाढीस लागतात. मद्यामध्ये शरीराला पोषक अशी नसíगक मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्यात येते. उदा- त्वचाविकार (तोंडावर पांढरट चट्टे येणे), डोळ्याचे विकार (रातांधळेपणा), मुखपाक (तोंड येणे) असे विकार निर्माण होतात.

आधुनिक काळातदेखील मैदा हा आरोग्यास घातक आहे हे सिद्ध झाले आहे. मैदा करण्याच्या क्रियेत क्रोमियम, िझक, तांबे व मॉलीबिडीनम यांसारखी शरीरवाढीस उपयोगी नसíगक मूलद्रव्ये नष्ट होतात, म्हणून तो कमी प्रमाणात खावा. कारण, आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सर्व नसíगक मूलद्रव्ये आवश्यक आहेत; परंतु समाजातील उच्चभ्रू सुशिक्षित वर्गापासून ते औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारवर्ग, शाळकरी मुले मद्याच्या पदार्थाना गरसमजुतीने प्रतिष्ठा मिळाल्याने चविष्ट असल्याने अति प्रमाणात खातात, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

पर्यायी पदार्थ- सर्व पदार्थ बनविण्यासाठी मद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्त्य देशांमध्येसुद्धा मद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.

मुलांना पालेभाज्या व डाळींचे थालिपीठ, नारळाची चटणी, मोड आलेले पदार्थ घालून केलेला पुलाव अशा प्रकारच्या सकस पदार्थाचा वापर करावा. गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले गुलगुले, पुरणपोळी, कापण्या, जाडसर गव्हाच्या भरडय़ाची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे, गोड-तिखट पुऱ्या अशा विविध पदार्थाचा वापर करावा. कारण हे पदार्थ गव्हापासून बनविल्यामुळे त्यातील सर्व नसíगक मूलद्रव्यांमुळे आरोग्य चांगले राहते. घरातील प्रत्येक गृहिणीने कौशल्यपूर्वक चौकस बुद्धीने जर घरगुती विविध पदार्थ बनविले, तर नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वाचेच आरोग्य अबाधित राहील यात शंका नाही. डॉ. शारदा महांडुळे