कोल्हापूरी मसाला चटणी ही सांगली, कराड, सातारा, कोल्हापूर या भागात विशेष करून स्वयंपाकात वापरतात.उन्हाळी कामातले हे एक कामच असते . एकदम वर्ष -सहा महीन्याची करून ठेवली की रोजचा स्वयंपाक करणे सोईचे व झटपट होते. सर्व भाज्या ,आमटी यामधे वापरली जाते.तसेच नुसती सुध्दा तेल घालून भाकरी सोबत खायला चांगली लागते.एखादा लहान कांदा, ही घेतला तर आणखी मजा येते जेवणाला. भाजीची आठवणही नाही येत. ही मसाला चटणी करणे मोठे कष्टदायक काम आहे.पण घरी बनवलेली चव काही न्यारीच असते. मग त्यात आपण एक शाॅर्टकट वापरू शकतो. अगदी मिरच्या आणणे, वाळविणे, कुटणे व मिरची पूड करणे,व नंतर पुढे मसाला करणे .या महाकष्टमय कामापेक्षा मिरचीपूड तयार आणावी व बाकी सर्व गरम मसाले,ओला मसाला घरी आणून मग चटणी करावी. लवकर होते.शहरी भागात रहात असू तर मिरच्या आणणे व वाळवणे जिकीरीचे होते.माझ्या घरी स्वयंपाकात गोडा मसाला वेगळा व लाल मिरचीपूड वेगळी असे वापरण्याचीच पध्दत आहे.पण काही भाज्यामधे म्हणजे भरले वांगे,दोडका अशा भाज्याना हाच मसाला छान लागतो. मग मी घरीच मिक्सरवर गोडा मसाला म्हणजे त्यात सर्व गरम मसाले येतातच अधिक मिरची पूड व ओला मसाला कांदा,लसूण,आले व कोथंबिर असे सर्व धेऊन कुटून थोडासा करून ठेवते.व नुसता ही खायला भाकरी,चपाती सोबत सर्वाना आवडतोच ! चला तर मग हा झटपट मसाला कसा करायचा पाहू !
साहीत्य :-
* लाल मिरचीपावडर १ किलो
* बारीक मीठ २५० ग्रँम
* कांदा उभा पातळ चिरून १किलो
* लसूण १००ग्रँम
* आलं १००ग्रँम
* कोथिंबिर १ जूडी निवडून
* गोडा मसाला ५०० ग्रँम
गोडा मसाला कृती या लिंकवर पहा 👇
http://swadanna.blogspot.in/2015/12/goda-masala.html?m=1
कृती :-
प्रथम कांदा तेलावर भाजून घ्या. आलं-लसूण कुटून घ्या. थंड होऊ द्या. कोथिंबिर चिरून घ्या.
आता मिक्सरमधे कांदा,आलं-लसूण व कोथिंबिर थोडे मीठ घालून एकत्र वाटून घ्या.
नंतर मिरचीपावडर व तयार गोडा मसाला एका मोठ्या परातीमधे घ्या. मोठ्या चमच्याने एकत्र करा. त्यामधे वरील वाटलेला मसाला घाला व हाताने सर्व एकत्र मिसळा.
शेवटी परत एकदा सर्व एकत्रित केलेला मसाला थोडा -थोडा मिक्सरमधे फिरवून काढा. म्हणजे व्यवस्थित एकजीव होतो.
आपली झटपट कोल्हापूरी मसाला चटणी तयार!
तयार मसाला स्वच्छ कोरड्या बरणीत भरून ठेवा.नुसता सुध्दा तेल घालून भाकरीसोबत खायला छान लागतो.भाजी-आमटीची चव तर अप्रतीम लागते.तुम्हीही नक्की करून बघा !
टीप:
मी वर्षभराच्या हिशेबाने मापे दिलीत. परंतु मिरचीपूड व गोडा मसाला वेगवेगळा तयार असेल तर २-३ महीन्यातून थोडी -थोडी ताजी तयार करा. चव चांगली लागते. मसाले वेगवेगळे ठेवल्याने, ज्यांचे घरी कांदा लसूण सर्वच भाज्यामधे घालत नाहीत त्यानाही सोईचे होते.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :
Post a Comment