10 March 2015

आलू मटार (Aloo Mattar)

No comments :

ही भाजी म्हणजे ऐत्यावेळी काही भाजी नसेल किंवा काही सुचले नाही की मी करते.सगळ्यान आवडते व पट्कन होते.बटाटे व फ्रोजन मटार उपलब्ध असले की झाले.ताजे मटार असतील तर जास्तच छान!

साहीत्य :-

1) उकडलेले बटाटे 4नग
2) वाफविलेले मटार अर्धी वाटी
3) लाल टमाटा  1
4) मोठा कांदा 1
5) आले लसूण मिरची पेस्ट आवडीप्रमाणे
6) लाल मिरची पावडर
7) मीठ,साखर
8) गरम मसाला किंवा मॅगी मसाला
9) फोडणी साहीत्य
10) तेल
11) गरजेनुसार पाणी
12) कोथंबीर

कृती :-

     प्रथम कांदा व टोमॅटो मोठे कापून मिक्सरला पेस्ट करून घ्या.उकडलेला बटाटा कापून घ्या.

नंतर पॅनमध्ये तेल गरम करून फोडणी करा.त्यात कांदा टोमॅटो पेस्ट, मिरची लसूण आले घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतावे. परतत आले की त्यात ह्ळद, मिरचीपूड घालावी.नंतर त्यात बटाट्याच्या फोडी व मटार घाला.मसाला,(मी मॅगी मसाला वापरला),मीठ व चवीला चिमूटभर साखर घाला.नीट हलवून गरजेइतके पाणी घालावे.दाटसरच ठेवा. दाट होण्यासाठी काही बटाट्याच्या फोडी चुरडाव्यात. आता एक ऊकळी काढा.

आता तयार भाजी ,वरून कोथंबिर घालून गरमा-गरम पोळी किंवा पुरी बरोबर वाढा.

No comments :

Post a Comment