05 March 2015

मक्याची भजी (Corn Pakoda)

No comments :

साहित्य :-

1) उकडलेले मक्याचे दाणे - १ कप 
2) कापलेला कांदा - १/२ कप 
3) बेसन १/४ कप 
4) तांदुळाचे पीठ- २ टीस्पून 
5) आलं - १ इंचाचा तुकडा 
6) मिरच्या- ३ ते ४ 
7) जिरे पूड- १  टीस्पून 
8) धणे  पूड- १  टीस्पून 
9) हळद- १/२  टीस्पून 
10) हिंग- १/२  टीस्पून 
11) चिरलेली कोथिंबीर - १/४ कप 
12) मीठ चवीनुसार 
13) तेल- तळण्यासाठी

कृती :-

प्रथम मक्याचे दाणे , मिरची आणि आले मिक्सरमध्ये पाणी न घालता भरड वाटा. फूड प्रोसेसर मधे जास्त चांगले वाटले जाते.

आता वाटलेल्या मिश्रणात कांदा, कोथिंबीर, वरील सर्व मसाले, बेसन,तांदुळाचे पीठ, मीठ आणि आवश्यकतेनुसार थोडे पाणी टाकून सर्व एकत्र करा. 

नंतर गरम तेलामधे लहान लहान भजी तळुन घ्या. गरमागरम भजी टोमॅटो केचप किंवा कुठल्याही चटणीसोबत खायला द्या.

No comments :

Post a Comment