16 March 2015

कायरस-पंचामृत (Kayras-Panchamrut)

No comments :

कायरस हा पदार्थ तसा पारंपारीक आहे . साधारण फेब्रूवारीच्या अखेरीस कोवळ्या कच्या कैर्या यायला सुरवात होते.तेव्हापासून ते जून परेंत आमच्याकडे हा आंबट-गोड चविचा पदार्थ अधून-मधून चालूच असतो सर्वानाच आवडतो.यालाच पंचामृत असेही म्हणतात.कायरस किंवा पंचामृत कैरी प्रमाणेच कवठ,पेरू,राय आवळे तसेच चिंच यापासून पण करतात.आज मी कैरीचा कायरस कसा केला ते पहा....

साहीत्य :-

1) कच्ची कैरी मध्यम आकाराची एक
2) चिरलेला गूळ पाव वाटी(कैरीच्या आंबटपणा नुसार कमी-जास्त घ्यावा) टीप पहा
3) भाजलेल्या तिळाचे कूट 1 टेस्पून
4) भाजलेल्या दाण्याचे कूट 2 टेस्पून
5) लाल सुकी मिरची तूकडे 7-8
6) कडीपत्ता,कोथंबिर
7) सुके खोबर्याचा किस 1टेस्पून
8) मेथी दाणे 7-8
9) हिंग,जिरे,मोहरी हळद फोडणीसाठी
10) तेल 1 टेस्पून
11) मीठ चवीनुसार
12) धणा-जिरा पावडर किंवा गोडा मसाला      1 टीस्पून
13) पाणी गरजेनुसार

कृती:-
      प्रथम कैरीची साल काढून पातळ चपट्या अशा साधारण एक-दीड इंचाच्या रूंद फोडी करून घ्याव्यात.

नंतर पातेल्यात तेल घालून, मेथी ,हींग ,मोहरी जिर्या ची फोडणी करा . त्यात हळद मिरची व कडीपत्ता टाकून परता व कैरीच्या फोडी त्यावर टाकाव्यात व परतून थोडेच पाणी घाला. झाकणी घालून थोडी वाफ आणावी.
फोडी मऊ होतील इतपत.

आता फोडी मऊ झाल्या असतील तर त्यामध्ये बाकीचे मीठ गूळ,मसाला घालून थोडे पाणी घालावे.उकळी आली की दाण्याचे,तिळाचे कूट खोबरे कूटून घालावे. गरज वाटली तर अजून थोडे पाणी घाला. कायरस रायत्या सारखा घट्टसरच असतो. पण जर का आवडत असेल तर थोडा वरणा सारखा पातळ करावा.म्हणजे भाता सोबत पण खाता येतो.एक उकळी आणा व गॅस बंद करा.वरून कोथंबिर घाला. कायरस तयार!

असा हा आंबट-गोड चवीचा कायरस चपाती किवा भात कशासोबतही छान लागतो.
बर्याच वेळा त्याच त्या भाज्या खावून कंटाळा येतो किंवा सूकी भाजी असते व अजून एखादी ग्रेव्हीसब्जी काय करावी असा प्रश्न असतो तेव्हा करून बघायला हरकत नाही.

टीप :- जर कैरी कोवळी असेल व आंबट नसेल तर गूळ कमी लागतो . कैरीच्या आंबटपणा नुसार घ्यावा.

No comments :

Post a Comment