ताकाला 'पृथ्वीवरचे अमृत' असे म्हटलेले आहे.तसेच ताक अतिशय पाचक असते. रोजच्याच जेवणात याचा समावेश असावा.ताकामध्ये दूधातील सर्व घटक असतात.त्यामुळे ज्याना दूध पचत नाही किवा आवडत नाही त्यानी आहारात ताकाचा वापर जरूर करावा.असे हे थंड ,पाचक चवदार ताक नुसतेच प्यायले तरी चालते.पण मसाला घालून केले तर जास्तच चवदार लागते.कसे करायचे पहा.
साहीत्य :-
* दही १ कप
* पाणी २ कप
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* पाणी २ कप
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* आले पेस्ट अर्धा टीस्पून
* हिरवी मिरची बिया काढून बारीक चिरून (आवडत असल्यास )
* काळे मीठ गरजेनुसार
* हिंग चिमूटभर
* साखर अर्धा टीस्पून ( गरज वाटली तर )
* कोथिंबीर बारीक चिरून
* पुदीना पाने
* हिरवी मिरची बिया काढून बारीक चिरून (आवडत असल्यास )
* काळे मीठ गरजेनुसार
* हिंग चिमूटभर
* साखर अर्धा टीस्पून ( गरज वाटली तर )
* कोथिंबीर बारीक चिरून
* पुदीना पाने
कृती :-
प्रथम दह्यात पाणी घालून घुसळावे.(दह्याच्या आंबटपणानुसार पाणी कमी-जास्त करा)
नंतर त्यात थोडी कोथंबिर,पुदीना,आले,मिरची वाटून पेस्ट व इतर सर्व वर दिलेला कोरडा मसाला घालून घुसळावे .हिरव्या मसाल्याची पेस्ट करून घातल्याने स्वाद चांगला येतोच व रंग ही छान फिकट पोपटी असा येतो.
आता तयार थंडगार ताक वर पुदीना, कोथंबिर पाने घालून प्यायला द्या.मस्त लागते.
टीप :- मसाला कोरडा तयार करून ठेवला तरी चालतो.ऐत्यावेळी आले,मिरची कोथंबिर व तयार मसाला टाकावा.वर पुदीना पाने घालावित.
आवडीप्रमाणे मिरेपूड,चाट मसाला पण वापरू शकता .
आवडीप्रमाणे मिरेपूड,चाट मसाला पण वापरू शकता .
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment