मुलांना नेहमी काहीतरी खमंग चटपटीत असे येता -जाता तोंडात टाकायला लागते असे आपण म्हणत आसतो. पण खरं सांगा आपण मोठ्याना पण चहा बरोबर असे काही खमंग असले तर बरे वाटतेच ना? मुले बाहेरचे रेडिमेड चिप्स आवडीने खातात. पण त्यापेक्षा आपण घरीच असे काही बनविले तर , पौष्टीक पण होईल . तसेच मुलांचे जोडीला आपली ,आला -गेला पाहूणा सर्वांचीच सोय होईल ! चला तर मग आपण खमंग चिप्स बनवू .
साहित्य :-
१) गव्हाचे पीठ २ वाट्या
२) मैदा २ वाट्या
३) बारिक रवा १/२ वाटी
४) तिखट ,मीठ चवीनुसार
५) हळद , हिंग गरजे पुरते
६) धना-जीरा पावडर २ चमचे
७) कसुरी मेथी चिमुटभर
८) कडिपत्ता बारिक चिरून
९) ओवा १/२ टिस्पुन ,तीळ १/२ टिस्पुन
१०) मोहन २ टेस्पुन
११) तळणि साठी तेल
१२) पाणी
कृती :-
सर्वात आधी रवा, मैदा व गव्हाचे पीठ चाळून घ्यावे.
नंतर वर साहित्यात दिलेला सर्व मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या .
आता तेलाचे मोहन घाला व सर्व पिठाला हाताने नीट चोळा . लागेल तसे पाणी घालून कणिक पुरीच्या ,कणकेप्रमाणे घट्ट मळा. अर्धा तास झाकून ठेवा.
नंतर तयार पीठाचा रोजच्या पोळीसाठी घेतो इतका मोठा एक गोळा घ्यावा व पातळ पोळी लाटावी. त्यावर सूरी अथवा काट्यांनी टोचे मारावेत.नंतर कट्लेटच्या साच्याने आपल्या आवडीचे लहान -लहान आकार कापावेत.
आता गरम तेलात मंद आचेवर तळावेत. गार होऊ द्यावेत. म्हणजे कुरकूरीत होतात .
टिप :-लाटलेलि पोळी पातळच असावी . नाहीतर चिप्स तळल्यावर कटकटित किंवा मऊ होतील .
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment