29 August 2015

नारळी भात (Sweet Rice)

No comments :

आमच्याकडे श्राावण महिन्यातल्या प्रत्येक सणाचे सणाचे पक्वान्न ठरलेले आहे. जसे की ,पंचमीला कानोले , सोमवार सोडण्यासाठी सांजा पोळी ,निरनिराळ्या खिरी,, गणपती उकडिचे मोदक तसेच राखी पोर्णिमा म्हणले की , "गोड नारळीभात " झालाच पहिजे. असा हा पारम्पारिक भात कसा केला जातो पहा !

साहित्य :-
१) बासमती तांदूळ १ वाटी
२) साखर किंवा गुळ १  वाटी
३) ओले खवलेले खोबरे १ १/२ वाटी
४) तूप पाव वाटी
५) फोडणी साठी लवंगा ४- ५
६) वेलची पूड व ड्रायफ्रूट्स आवडिनुसार
७) पाणी  २ वाट्या

कृती :-

तांदूळ धुवून १५ मिनट ठेवावे .तोपर्यत गॅस वर पाणी गरम करण्यास ठेवावे .

नंतर गॅस वर पातेल्यात तूप घालून त्यात लवंगा टाका .आता त्यावर तांदूळ टाकून परता.

नंतर गरम पाणी घालून भात शिजत राहू दे . पूर्ण शिजणेच्या आधी शेवटी भातात खोबरे ,साखर व वेलची पूड ,ड्रायफ्रूट्स घालून नीट हलवा .एक वाफ येऊ दे.

पांच मिनिटांनी गॅस बंद करावा  व वरून कडेने थोडे तूप सोडावे..म्हणजे चिकट होत नाही भात .

आता वाटिला आतून तुपाचा हात लावून काजू बदमाचे काप घाला व भात भरून मुद पडावि व वरून साजूक तुपाची धार सोडून गरमागरम गोड नारळी भात भाऊरायाला खायला द्या .

टिप :-  ४-५ वाट्यापर्यत करायचा असेल तर अशा पध्दतीने झट्पट केला तर चालतो .जास्त मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर भात आधी शिजवुन घ्यावा व नंतर सखरेच्या पाकात टाकून करावा.
शक्यतो गुळच वापरावा .रंग पण छान केशरी येतो व आरोग्याला पण चांगला. साखर घातली तर चिमुटभर खाद्यरंग वापरा .

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment