श्रावण महीना म्हणजे सण-वार यांची रेलचेल असते. रोजच नैवेद्यासाठी काही गोड करायचे असते. तसेच बरेच जण श्रावणी धरतात म्हणजे की फक्त संध्याकाळीच जेवतात. तर जेवणात तिखट ,गोड ,खारट आंबट असे सर्वच चवीचे जेवण असेल तर जेवणात मजा येते व पोट पण भरते. तर आज तांदूळाची खीर करुया .काय साहित्य लागते व कशी करायची पहा.
साहित्य :-
१) बासमती तांदूळ अर्धी वाटी
२) साखर अर्धी वाटी
३) दूध अर्धा लिटर
४) लवंगा ४
५) वेलची , सुका मेवा
६) तूप २ टेस्पुन
कृती :-
प्रथम तांदूळ तूपामधे लवंगा टाकून त्यावर गुलाबी भाजून घ्या.ते थंड होऊ द्या . तोपर्यंत दूध एका बाजूला आटवत ठेवून द्या .
आता तांदूळ मिक्सरवर रवाळ वाटून घ्या . नंतर आटवत ठेवलेल्या दूधामधे घाला. थोडे उकळू द्या . तांदूळ बारीक केले असलेने लगेचच शिजतात .
नंतर साखर, सुका मेवा व वेलची पूड घालून गॅस बंद करावा .
पुरी सोबत किंवा पोळी सोबत खाण्यास द्या.
टिप : खीरीसाठी तांदुळ शक्यतो आम्बेमोहोर किंवा बासमतीच वापरा .
आधी भात शिजवुन घेऊन नंतर दूध घालून पण ही खीर केली जाते.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment