25 August 2015

पनीर पराठा (Paneer Paratha)

No comments :

कोणताही पराठा प्रकार मला नेहमीच आवडतो.कारण गरमा-गरम पराठ्यासोबत एखाद लोणचं, दही किंवा लोणी असलं की मस्त पूर्ण जेवण झाल्याचच समाधान मिळत. बर्याचदा सुटी भाजी व पोळी मुलांना नको असते पण तीच भाजी घालून केलेला पराठा आवडीने खातात. आज मी 'पनीर पराठा' केलाय. पनीरमधे प्रोटीन,कार्बोहायड्रेड व कॅल्शियम भरपूर असते व पौष्टीक असते. साहीत्य व कृती,

साहीत्य :-

* पनीर
* हिरवी मिरची,आलं पेस्ट
* कोथंबिर बारीक चिरून
* धना-जीरा पावडर
* मीठ चवीला
* गव्हाचे पीठ
* पाणी कणिक मळण्यासाठी
* बटर/ तेल भाजण्यासाठी

कृती :-

प्रथम गव्हाचे पीठ चमचाभर तेल व चिमूटभर मीठ घालून नेहमीच्या कणिकेप्रमाणे कणिक मळून घ्या. पंधरा मि. झाकून ठेवा. तोपर्यंत,

पनीर हाताने चूरून मोकळे करून घ्या. नंतर त्यामध्ये मिरची ,आलं पेस्ट , धना-जीरा पावडर,मीठ,कोथंबीर घालून, हाताने  नीट एकजीव करून सारण तयार करा.

आता तयार सारण कणकेचा लहानसा गोळा घेऊन त्यामधे पूरणा सारखे भरा. व अलगद पीठावर लाटा. बटर/तेल सोडून तव्यावर दोन्ही बाजूनी खरपूस भाजा.

गरमा-गरम पराठा लोणचं/ हिरवी चटणी  कशासोबतही खा. तसाच नुसता खाल्ला तरी छान लागतो. मुलांना डब्यात देण्यास पण सोईचा आहे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment