25 August 2015

सांजाची पोळी ( Saanjachi Poli)

No comments :

श्रावण महीना म्हणजे रोजच काही गोड-धोड करावे लागते कधी उपवास सोडताना तर कधी नैवेद्याला ! तर हि सांजाची पोळी खास करून श्रावणसोमवार चा उपवास सोडताना बरेच ठिकाणी केली जाते . कशी केली पहा,

साहित्य :-
सारणासठी
१) रवा १ वाटी
२) चिरलेला गुळ १ १/२ वाटी
३) तूप १/४ वाटी
४) वेलची पुड
५) पाणी १ १/२ वाटी
आवरणासाठी :-
१) गव्हाचे पीठ ४ वाट्या
२) तेल किंवा तूप पोळी भाजण्यासाठी
३) मीठ चिमुटभर
४) पाणी गरजेनूसार

कृती :-

    प्रथम तूपावर रवा चांगला गुलाबी भाजून घ्या.

नंतर पाणी गरम करणेस ठेवा. त्यात चिरलेला गुळ घालावा .गूळ विरघळला  की त्यात रवा  घालून नीट हलवा. झाकून एक वाफ आणावि. गॅस बंद करा . थंड होऊ दे .

तोपर्यंत कणिक मीठ घालून मळून घ्या .फार घट्ट नको व अगदी पुरण पोळी प्रमाणे सैल पण नको. मध्यम असावी . पंधरा मिनीट मुरु द्यावी.

आता वर तयार असलेला सांजा वेलची पुड  घालून चांगला मळून घ्या.

आता तवा तापत ठेवावा  व पुरणपोळी  प्रमाणे कणिकेचा उंडा घेऊन त्यामधे तेवढाच सांजा भरावा. व थोडी जाडसरच पोळी लाटावि . तव्यावर तेल /तूप सोडून खरपुस भाजावी .

गरम पोळीवर तूप घालून दुधासोबत खावी .

टिप्स :- सांजा साखर घालून पण केला तरी चालतो . पण गूळ आरोग्याला चांगला व गोड पण व्यवस्थित होते.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. 

No comments :

Post a Comment