Showing posts with label Subji. Show all posts
Showing posts with label Subji. Show all posts
22 September 2014
रताळ्याची भाजी(Ratalyachi Bhaji)
साहीत्य:-
* रताळी
* तूप ,जीरे
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
* हिरव्या मिरच्या' आवडीनुसार
* खोवलेला नारळ
* मीठ,साखर चवीनुसार
* तूप ,जीरे
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
* हिरव्या मिरच्या' आवडीनुसार
* खोवलेला नारळ
* मीठ,साखर चवीनुसार
कृती:-
प्रथम रताळी स्वच्छ धुवून घ्यावी व लहान तुकडे करावेत.कढईत तूप गरम करावे.. त्यात जीरे आणि हिरवी मिरची घालून फोडणी करावी.त्यात रताळ्याचे तुकडे घालावे. मीठ घालून मिक्स करावे. कढईवर पाण्याचे झाकण ठेवावे. मंद आचेवर रताळ्याचे तुकडे शिजू द्यावे. मधेमधे हलवावे जेणेकरून रताळी करपणार नाहीत.
रताळी शिजली कि त्यात शेंगदाणा कूट, साखर आणि खोबरे घालावे. मिक्स करून परतावे.
गरम-गरम सर्व्ह करावी .
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
17 September 2014
शेवग्याच्या शेंगाची भाजी ( Drumstick Subji )
शेवग्याची पाने,फुले,शेंगा सर्वच वापरले जाते .पण शेंगा जास्त चवदार असल्याने जास्त वापरल्या जातात.शेवग्याचे पिठले, सांबार ,भाजी,मजी, थालीपिठ असे अनेक प्रकार करतात.शेवग्याची पाने व फुले कामोत्तेजक असतात.तसेच अनेक लैगिक तक्रारी दुर करणारा आहे.तर अशा शेवग्याची भाजी कशी करायची पहा.
साहित्य:-
* शेवग्याच्या शेंगा
* भाजलेल्या शेगदाण्याचे कूट
* तिखट,मीठ,गरम मसाला
* तेल,मोहरी,हिंग
* सजावटीसाठी खोबरे,कोथंबिर
* शेवग्याच्या शेंगा
* भाजलेल्या शेगदाण्याचे कूट
* तिखट,मीठ,गरम मसाला
* तेल,मोहरी,हिंग
* सजावटीसाठी खोबरे,कोथंबिर
कृति:-
प्रथम शेंगा स्वच्छ धुवून शिरा काढाव्यात व आपल्या आवङीप्रमाणे तुकङे करून घ्यावेत.
प्रथम शेंगा स्वच्छ धुवून शिरा काढाव्यात व आपल्या आवङीप्रमाणे तुकङे करून घ्यावेत.
नंतर एका भांङ्याधे पाण्यात मीठ टाकून शिजवून घ्याव्यात.
शिजलेल्या शेंगा पाण्यातून काढून बाजूला ठेवाव्यात.कढईमधे तेल घालून हिगमोहरी,हळद घालून फोङणी करावी व शिजलेल्या शेंगा घालाव्यात.त्यामधे तिखट,मीठ ,गरम मसाला व दाण्याचे कूट घालून झाकून एक वाफ आणावी.
बाऊलमधे काढून खोबरे कोथंबिर घालावे.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
कच्या फणसाची भाजी (Jackfruit Subji)
फणसाची भाजी म्हणजे कोकण डोळ्यासमोर येते.तसे पाहीले तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातच प्रसिध्द आहे.साधारण मार्च ते मे या कच्च्या भाजीचा मोसम असतो.नंतर पिकलेले फणस यायला लागतात. हा फणस साफ करणे,चिरणे व नंतर उकडून घेणे एवढी कृती आधि तयार असेल तर भाजी पट्कन होते.पण हेच काम जरा वेळखाऊ असते.फणसाला चिक असतो .त्यामूळे हाताला ,विळीला आधि गोडेतेल लावून मग चिरावा. वरची साल,आतील कठीण भाग काढून मग मधल्या भागाच्या फोडी करून घ्याव्यात.नंतर पुढील कृती
साहित्य:-
* साफ करून चिरलेल्या फणसाच्या फोङी
* भिजवलेले शेंगदाणे,भिजवलेले वाटाणे/हरभरे
* गरम मसाला,कच्चा मसाला, मीठ,गूळ,हळद
* लाल सुकी मिरची,कङीपत्ता
* तेल,फोङणीसाहीत्य
* ओले खोबरे,कोथंबिर
* भिजवलेले शेंगदाणे,भिजवलेले वाटाणे/हरभरे
* गरम मसाला,कच्चा मसाला, मीठ,गूळ,हळद
* लाल सुकी मिरची,कङीपत्ता
* तेल,फोङणीसाहीत्य
* ओले खोबरे,कोथंबिर
कृति:-
सर्वात आधी ,चिरलेल्या फणसाच्या फोङी व शेगदाणे, वाटाणे कुकरमधे दोन शिट्ट्या काढून शिजवून घ्यावे.
थंङ झाल्यावर तुकङे हाताने चूरङून किवा दगङी बत्याने ठेचून घ्यावेत.
आता दूसर्या एका कढईमधे तेल घालून त्यात मोहरी हिग जीरे घालून फोङणी करून घ्यावी. फोङणीमधे हळद मिरची व कङीपत्ता घालून चांगले परतावे व त्यावर भाजी टाकावी. भाजीमधे मीठ मसाले घालावेत व एक वाफ आणावी वरून खोबरे कोथंबिर घालावे.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
टिप:-
*या भाजीला थोङ्या जास्त तेलाची व चरचरीत फोङणी असलेली चांगली लागते.
यामधे आपल्या आवडीनुसार आपण भिजवून वाफलेले वाल किंवा काळे वाटाणे पण वापरू शकतो.
*या भाजीला आवडीनुसार कांदा लसूण वापरू शकतो.पण शक्यतो कमीत-कमी मसाले वापरून केली भाजी तर तीचा मुळ स्वाद जास्त चांगला लागतो व टिकून रहातो.
16 September 2014
कर्टुल्याची भाजी (रानकारले )(Kartulyachi Bhaji)
कर्टुली ही ,रानभाजी आहे.कारल्याच्या जातकुळीमधली आहे पण कङू नसते .यालाच रानकारलीसुध्दा म्हणतात. मंङईमधे सहज उपलब्ध नसते.पावसाळी मोसमातच येते. शक्यतो नैसर्गिक स्वरूपातच चांगली लागते,जास्त मसाले वापरू नयेत.
साहीत्य :-
* कर्टुली
* भाजलेल्या दाण्याचे कूट
* फोङणीसाठी तेल,मोहरी,हीग,हळद
* मीठ,मिरची पावङर,
* काळा मसाला(ऐच्छीक)
* ओले खोबरे , कोथंबिर
* फोङणीसाठी तेल,मोहरी,हीग,हळद
* मीठ,मिरची पावङर,
* काळा मसाला(ऐच्छीक)
* ओले खोबरे , कोथंबिर
कृति:-
सर्वात आधि कर्टुली स्वच्छ, भरपूर पाण्यात धुवून नंतर गोल किंवा चौकोनी फोडी करून चिरून घ्यावीत. चिरलेली भाजी तेलाची फोङणी करून त्यावर टाकून थोङी परतून घ्यावी व पाण्याचा हबका मारून अथवा ताटलीवर पाणी ठेवून वाफवावी.वाफून मऊ झाल्यावर त्यात मीठ, तिखट, मसाला घालावे व नीट हलवून परत एक हलकी वाफ आणावी .
तयार भाजी एका बाऊल मधे काढून वरून खोबरे कोथबिर घालावे.
टिप:-
*कर्टुली भरपूर पाण्यात नीट धुवावीत.त्याच्या काट्यामधे माती रहाण्याची शक्यता असते.व भाजी खाताना तोङामधे खर लागते.
*चिरल्यावर फक्त जून व कङक बियाच काढाव्यात . सर्वच काढू नयेत.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
Subscribe to:
Posts
(
Atom
)