शेवग्याची पाने,फुले,शेंगा सर्वच वापरले जाते .पण शेंगा जास्त चवदार असल्याने जास्त वापरल्या जातात.शेवग्याचे पिठले, सांबार ,भाजी,मजी, थालीपिठ असे अनेक प्रकार करतात.शेवग्याची पाने व फुले कामोत्तेजक असतात.तसेच अनेक लैगिक तक्रारी दुर करणारा आहे.तर अशा शेवग्याची भाजी कशी करायची पहा.
साहित्य:-
* शेवग्याच्या शेंगा
* भाजलेल्या शेगदाण्याचे कूट
* तिखट,मीठ,गरम मसाला
* तेल,मोहरी,हिंग
* सजावटीसाठी खोबरे,कोथंबिर
* शेवग्याच्या शेंगा
* भाजलेल्या शेगदाण्याचे कूट
* तिखट,मीठ,गरम मसाला
* तेल,मोहरी,हिंग
* सजावटीसाठी खोबरे,कोथंबिर
कृति:-
प्रथम शेंगा स्वच्छ धुवून शिरा काढाव्यात व आपल्या आवङीप्रमाणे तुकङे करून घ्यावेत.
प्रथम शेंगा स्वच्छ धुवून शिरा काढाव्यात व आपल्या आवङीप्रमाणे तुकङे करून घ्यावेत.
नंतर एका भांङ्याधे पाण्यात मीठ टाकून शिजवून घ्याव्यात.
शिजलेल्या शेंगा पाण्यातून काढून बाजूला ठेवाव्यात.कढईमधे तेल घालून हिगमोहरी,हळद घालून फोङणी करावी व शिजलेल्या शेंगा घालाव्यात.त्यामधे तिखट,मीठ ,गरम मसाला व दाण्याचे कूट घालून झाकून एक वाफ आणावी.
बाऊलमधे काढून खोबरे कोथंबिर घालावे.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment