साहित्य:-
* रताळ्याचा किस २वाट्या
* शिंगाड्याचे पिठ १/२ वाटी
* राजगिरा पिठ १/४ वाटी
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १/४ वाटी
* लाल मिरची पावडर/हिरवी मिरची पेस्ट
* मीठ चवीनुसार
* जिरेपूड/जिरे
* तेल
* शिंगाड्याचे पिठ १/२ वाटी
* राजगिरा पिठ १/४ वाटी
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १/४ वाटी
* लाल मिरची पावडर/हिरवी मिरची पेस्ट
* मीठ चवीनुसार
* जिरेपूड/जिरे
* तेल
कृती:-
प्रथम रताळी एका पसरट बाऊलमधे किसून घ्यावीत.त्यामधे वरील सर्व पिठे व मिरची पेस्ट ,मीठ,जिरे घालावे. नीट एकत्र करून कणिके प्रमाणे गोळा तयार करावा.गरजेनुसार पिठे कमी-जास्त करावीत.
तयार पीठाचे लहान-लहान लाटे (साधारण ५-६ इंच लांब व २ इंच व्यासाचे ) तयार करून दहा ते पंधरा मिनिट चाळणीवर वाफवून घ्यावेत.
थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात. कापलेल्या वड्या आवडीप्रमाणे शॅलोफ्राय अथवा डीपफ्राय कराव्यात.
टिप्स:-
* उपवास नसेल तर आपण त्यात आवडीप्रमाणे गरम मसाला पण धालू शकतो.
*आदले दिवशी जर लाटे उकङून फ्रीजमधे ठेवले तर,वड्या कापताना तुटत नाहीत व आयत्यावेळी पट्कन उपयोगात येतात .
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment