साहित्य:-
* दोन-तीन तास भिजवलेली मूगङाळ १ वाटी
* साखर १वाटी
* साजूक तूप १वाटी
* खवा १ वाटी
* दूध व पाणी २ वाटी ( दोन्ही निम्मे-निम्मे )
* वेलचीपूङ ,सुकामेवा
* साखर १वाटी
* साजूक तूप १वाटी
* खवा १ वाटी
* दूध व पाणी २ वाटी ( दोन्ही निम्मे-निम्मे )
* वेलचीपूङ ,सुकामेवा
कृती:-
प्रथम ङाळ मिक्सरचर वाटून घ्यावी.नंतर पॅनमधे खवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा .त्याच पॅनमधे तूप घालून वाटलेली ङाळ चांगली तांबूस गुलाबी रंगावर तूप सूटेपर्यत भाजावी.
नंतर त्यात गरम दूध व पाणी घालून आटेपर्यत हलवावे शेवटी साखर व सुकामेवा घालून नीट हलवून गॅस बंद करावा.
टीप:- खवा नसला तरी चालतो.असेल तर जास्तच राजस बनतो .मात्र या हलव्याला तूप कमी बिलकूल चालत नाही.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment