17 September 2014

कच्या फणसाची भाजी (Jackfruit Subji)

No comments :
फणसाची भाजी म्हणजे कोकण डोळ्यासमोर येते.तसे पाहीले तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातच प्रसिध्द आहे.साधारण मार्च ते मे या कच्च्या भाजीचा मोसम असतो.नंतर पिकलेले फणस यायला लागतात. हा फणस साफ करणे,चिरणे व नंतर उकडून घेणे एवढी कृती आधि तयार असेल तर भाजी पट्कन होते.पण हेच काम जरा वेळखाऊ असते.फणसाला चिक असतो .त्यामूळे हाताला ,विळीला आधि गोडेतेल लावून मग चिरावा. वरची साल,आतील कठीण भाग काढून मग मधल्या भागाच्या फोडी करून घ्याव्यात.नंतर पुढील कृती

साहित्य:-
* साफ करून चिरलेल्या फणसाच्या फोङी
* भिजवलेले शेंगदाणे,भिजवलेले वाटाणे/हरभरे
* गरम मसाला,कच्चा मसाला, मीठ,गूळ,हळद
*  लाल सुकी मिरची,कङीपत्ता
* तेल,फोङणीसाहीत्य
* ओले खोबरे,कोथंबिर

कृति:-
सर्वात आधी ,चिरलेल्या फणसाच्या फोङी व शेगदाणे, वाटाणे कुकरमधे दोन  शिट्ट्या काढून शिजवून घ्यावे. 

थंङ झाल्यावर तुकङे हाताने चूरङून किवा दगङी बत्याने ठेचून घ्यावेत.

आता दूसर्या एका कढईमधे तेल घालून त्यात मोहरी हिग जीरे घालून फोङणी करून घ्यावी. फोङणीमधे हळद मिरची व कङीपत्ता घालून चांगले परतावे व त्यावर भाजी टाकावी. भाजीमधे मीठ मसाले घालावेत व एक वाफ आणावी  वरून खोबरे कोथंबिर घालावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

टिप:-
*या भाजीला थोङ्या जास्त तेलाची व चरचरीत फोङणी असलेली चांगली लागते.
यामधे आपल्या आवडीनुसार आपण भिजवून वाफलेले वाल किंवा काळे वाटाणे पण वापरू शकतो.

*या भाजीला आवडीनुसार कांदा लसूण वापरू शकतो.पण शक्यतो कमीत-कमी मसाले वापरून केली भाजी तर तीचा मुळ स्वाद जास्त चांगला लागतो व टिकून रहातो.

No comments :

Post a Comment