03 September 2014

काॅर्न पालक क्रिस्पी(Corn-Palak Crispy)

No comments :

साहीत्य:-
* वाफवलेले स्वीटकाॅर्नचे दाणे १कप
* चिरलेला पालक १कप
* बारीक चिरलेला कांदा,हिरवी मिरची,आले-लसूण पेस्ट,मिठ आवडीनुसार
* चना डाळ पिठ,तांदूळ पिठ/काॅर्न फ्लोअर गरजेनुसार
*चिमूटभर सोङा
* तळणीसाठी तेल

कृती:-
प्रथम वाफवलेले काँर्न,मँश  करून घ्यावेत.त्यामधे चिरलेला पालक,कांदा,मिरची,आले- लसूण पेस्ट,मीठ व मिळून येण्यापुरते चना डाळ पीठ,काॅर्नफ्लोअर घालावे. गरजेनुसार पाणी घालून भजीचे पीठाप्रमाणे भिजवावे व सोडा घालून डीप फ्राय करावे.
"काॅर्न-पालक क्रीस्पी" तयार !

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment