22 September 2014

रताळ्याची भाजी(Ratalyachi Bhaji)

No comments :

साहीत्य:-
* रताळी
* तूप ,जीरे
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
* हिरव्या मिरच्या' आवडीनुसार
* खोवलेला नारळ
* मीठ,साखर चवीनुसार
कृती:-
       प्रथम रताळी स्वच्छ धुवून घ्यावी व लहान तुकडे करावेत.कढईत तूप गरम करावे.. त्यात जीरे आणि हिरवी मिरची घालून फोडणी करावी.त्यात रताळ्याचे तुकडे घालावे. मीठ घालून मिक्स करावे. कढईवर पाण्याचे झाकण ठेवावे. मंद आचेवर रताळ्याचे तुकडे शिजू द्यावे. मधेमधे हलवावे जेणेकरून रताळी करपणार नाहीत.
रताळी शिजली कि त्यात शेंगदाणा कूट, साखर आणि खोबरे घालावे. मिक्स करून परतावे.
गरम-गरम सर्व्ह करावी .

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment