16 September 2014

कर्टुल्याची भाजी (रानकारले )(Kartulyachi Bhaji)

No comments :
                                                           
कर्टुली ही ,रानभाजी आहे.कारल्याच्या जातकुळीमधली आहे पण कङू नसते .यालाच रानकारलीसुध्दा म्हणतात. मंङईमधे सहज उपलब्ध नसते.पावसाळी मोसमातच येते. शक्यतो नैसर्गिक स्वरूपातच चांगली लागते,जास्त मसाले वापरू नयेत.

साहीत्य :-
* कर्टुली
* भाजलेल्या दाण्याचे कूट
* फोङणीसाठी तेल,मोहरी,हीग,हळद
* मीठ,मिरची पावङर,
* काळा मसाला(ऐच्छीक)
* ओले खोबरे , कोथंबिर

कृति:-
सर्वात आधि कर्टुली स्वच्छ, भरपूर पाण्यात धुवून नंतर गोल किंवा चौकोनी फोडी करून चिरून घ्यावीत. चिरलेली भाजी तेलाची फोङणी करून त्यावर टाकून थोङी परतून घ्यावी व पाण्याचा हबका मारून अथवा ताटलीवर पाणी ठेवून वाफवावी.वाफून मऊ झाल्यावर त्यात मीठ, तिखट, मसाला घालावे व नीट हलवून परत एक हलकी वाफ आणावी .

तयार भाजी एका बाऊल मधे काढून वरून खोबरे कोथबिर घालावे.

टिप:-
*कर्टुली भरपूर पाण्यात नीट धुवावीत.त्याच्या काट्यामधे माती रहाण्याची शक्यता असते.व भाजी खाताना तोङामधे खर  लागते.

*चिरल्यावर फक्त जून व कङक बियाच काढाव्यात . सर्वच काढू नयेत.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
 

No comments :

Post a Comment