25 September 2014

दुधीभोपळ्याचे पराठे(Dudhi Parathe)

No comments :

साहित्य:-
* दुधी भोपळा
* गव्हाचे पीठ आवशक्यतेनूसार
* बेसन पीठ थोडेसे (नसले तरी चालते )
* हळद, हिंग, तीळ मिठ,आवडीप्रमाणे
* हिरव्या  मिरचीचा ठेचा किंव्हा लाल मिरची पूड आवडीप्रमाणे
* जिरे पूड किव्हा  जिरे ,आले-लसूण पेस्ट
* चिरलेली कोथिंबीर
* तेल

कृति:-

प्रथम दुधी किसून घ्यावा.किसलेला किस थोड्या तेलावर परतावा.मऊ झाला ची गॅस बंद करावा.
मिश्रण थंड झाल्यावर त्यात तीळ, मिरची पूड / ठेचा, कोथिंबीर व मीठ टाकावे.  छान एकत्र करून त्यात गव्हाचे व डाळीचे पीठ घालावे.पाणी अजिबात वापरू नये. तेल टाकून कणिक मळून घ्यावी.  

आता तयार कणकेचे लहान-लहान गोळे करून पराठे लाटावेत व तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावेत .

तयार पराठे लोणचे,चटणी किंवा दह्याबरोबर चवदार लागतात. नाष्ट्यासाठी एक उत्तम पौष्टिक पदार्थ आहे .

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment