23 September 2014

उपवासाचे भाजणी थालीपीठ(Fasting Thalipith)

No comments :

भाजणी साहित्य:-
* साबुदाणा १ किलो
* वरी तांदूळ १ किलो
* राजगिरा - ५०० ग्रॅम
* जीरे - १०० ग्रॅम
थालीपीठ साहित्य
* भाजणी पीठ एक वाटी
* शेगदाण्याचे कुट दोन मोठे चमचे
* मिरची पावडर/ हिरवी मिरची
* मिठ साखर
* पाणी /ताक
* उकडलेला बटाटा ऐच्छिक

भाजणी कृति:-
प्रथम साबूदाणा, वरी तांदूळ, आणि राजगिरा गुलाबी रंग येईस्तोवर मंद आचेवर वेगवेगळे भाजावे. साबुदाणा भाजण्यापूर्वी त्याला एक चमचा तूप लावून घ्यावे म्हणजे भाजताना कढईला चिकटणार नाही. जीरे न भाजताच घालावे. सर्व जिन्नस एकत्र करावे. मिक्सरमध्ये बारीक करावे किंवा गिरणीमधून थोङे सरसरीत दळून आणले तरी चालते.पण गिरणीमधे भेसळ येण्याची शक्यता असते. ही भाजाणी महीनाभर सुध्दा छान टीकते .  

थालीपीठ कृति:-
प्रथम उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.त्यामधे भाजणी, बटाटे, मिरची पूड, शेंगदाण्याचा कूट, साखर आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
पाणी किंव्हा ताक घालून मळून घ्यावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे.

नंतर एक गोळा नाँनस्टीक तव्याला तेलाचा/तूपाचा हात लावून  थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.छीद्रात थोडे तूप सोडावे. मध्यम आचेवर  थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. 
शेंगदाण्याची उपवासाची चटणी अथवा दह्या सोबत खावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment