01 September 2014

बटाट्याची खेकङा भजी/आलू भुजिया( Aalu Bhujiya)

No comments :
साहित्य:-
* बटाटे २ नग
* चना डाळ पीठ आवश्यकतेनुसार
* तिखट,मीठ,हलद पावङर,हिंग पावङर
* तळणीसाठी तेल

कृती:-

प्रथम बटाटा साल काढून मोठ्या (जाङ) खिसणीवर किसून घ्यावा. 

किसलेला बटाटा एका बाऊलमधे घेऊन त्यावर तिखट मीठ हळद हींग सर्व घालून , व्यवस्थित चोळून घ्यावे. दहा ते पंधरा मिनीटे तसेच ठेवावे.

थोड्या वेळाने पाणी सुटेल.त्यामधे मावेल एवढेच पिठ घालून हलक्या हाताने एकत्र करावे व गरम तेलात भजी सोडावित.खरपूस तळून घ्यावीत.

गरमा-गरम भजी हिरवी चटणी अथवा टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करावीत.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment