22 September 2014

चना चाट(Chana Chat)

No comments :

साहित्य:-
* भिजवलेले हरभरे (आख्खे चणे )
* मिठ, काळेमिठ , चाट मसाला
* कांदा,कोथिबीर,हिरवी मिरची
* लिंबू

कृती:-
प्रथम हरभरे रात्री किंवा आठ तास भिजत ठेवावे. भिजले कि कूकरमध्ये मऊ शिजवून घ्यावे. शिजवताना पाण्यात मिठ घालावे.

नंतर कांदा, टोमॅटो, मिरची तिन्ही बारीक चिरून घ्यावे. शिजलेले चणे थोडे गरम असतानाच त्यात चवीनुसार लिंबाचा रस, काळे मिठ, कोथिंबीर, चाट मसाला घालावा. आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, मिरची घालावी. सर्व छान मिक्स करावे व खायला द्यावे.
लहान मुलाना असे चटपटीत खाणे आवडते,व पौष्टीक खूराक पण झाला .

टीप:
कैरीच्या दिवसात कैरीचे बारीक तुकडे घालावेत छान लागतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment