23 September 2014

वरी तांदुळाच्या सांजोर्या(Varichya Sanjorya)

No comments :

साहित्य:-
* वरीचे तांदूळ १ वाटी
* साखर किंवा चिरलेला गुळ १ वाटी 
* खवलेले ओले खोबरे १वाटी
* वेलची पूड
* साजूक तूप २ टीस्पून
* पाणी १ १/२ (दिड) वाटी

कृति:-
प्रथम तांदुळ निवडून, धुऊन चाळणीत निथळत ठेवावेत.एकीकडे पाणी गरम करत ठेवावे.

नंतर कढईत तूप गरम करून धुतलेले वरीचे तांदुळ गुलाबी रंगावर परतून घ्यावेत.त्यावर उकळते पाणी घालून हलवावे. झाकण ठेऊन दोन वाफा काढाव्यात.

वरी तांदूळ शिजले की ओले खोबरे, साखर किंव्हा गुळ, वेलची पूड घालावी. चांगले हलवून झाकण ठेऊन वाफ काढावी.

थाळीला तूप लाऊन शिजलेले मिश्रण थापावे.
थोडे थंड झाले की त्याच्या वड्या कापाव्या.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment