23 September 2014

रताळ्याचा किस(Ratalyacha Khis)

No comments :

साहित्य :-

* रताळी
* तूप
* जीरे
* भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
* हिरव्या मिरच्या, चिरून
* मीठ आणि साखर चवीनुसार

कृती :-
 प्रथम रताळी धुवून साल काढून घ्यावी व एका पसरट भांड्यात पाणी  घेऊन त्यात किसावीत. म्हणजे किस काळा पडत नाही.

कढईमधे तूपाची फोडणी करून त्यावर धुतलेला किस(धुवून पाणी निथळून काढावे) टाकावा व परतून त्यावर झाकणी घालावी.एक वाफ आणावी.

वाफ आणून मऊ झालेल्या किसावर मीठ,साखर घालून थोडे परतावे.मीठ साखर विरघळले की शेवटी दाण्याचे कूट घालावे व एक-दोन परतण्या देऊन गॅस बंद करावा.

गरम किस तयार !

टिप:-
याप्रमाणेच बटाट्याचा व सुरणाचा किस पण होतो.फक्त सुरण किसून आमसोलाच्या किंवा चिंचेच्या पाण्यात टाकावे.म्हणजे त्याचा खाजरेपणा कमी होतो.बाकी सर्व कृती वरील प्रमाणेच करावी.

No comments :

Post a Comment