23 September 2014

वरीचे उपवासाचे घावन/धिरडे(Vari tandalache Dhirade)

No comments :

साहित्य:-
* वरी तांदूळ १ वाटी
* साबुदाणे १/२ वाटी
* उकडलेला बटाटा १ मोठा
* हिरव्या मिरच्या
* जीरे
* खवलेल ओल खोबर  (ऐच्छिक )
* मीठ- चवीनुसार
*  तेल किंव्हा साजूक तूप, जरुरीनुसार
* पाणी,जरुरीनुसार

कृति:-
प्रथम साबुदाणे आणि वरी धूऊन  वेगवेगळे भिजत घाला. पूर्ण बुडतील इतके पाणी त्यात ठेवा. रात्रभर किंव्हा चार तास तरी भिजू द्या.

आता भिजवलेले वरी व साबूदाणे ,मिरच्या, जीरे आणि ओल खोबर मिक्सरवर बारीक वाटून घ्या. उकडलेला बटाटा सोलून, किसणीवर किसून घ्या.
वरील वाटलेले मिश्रण आणि किसलेला बटाटा, एकत्र करून त्यामधे चवीनुसार मीठ टाका. मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. डोश्याच्या पिठापेक्षा थोड घट्ट ठेवावे.

नॉन-स्टिक तवा तापवून थोडे तेल किंवा तूप घालून त्यावर हे मिश्रण डावाने घालावे व उलट-सुलट खरपूस भाजावे.

उपवासाच्या कोणत्याही चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा .

टिप:-
वरील मिश्रणात बटाटा घातला नाही तरी चालतो. परंतु ते घावन लगेचच खावे लागतात.  कारण नंतर ते चिवट किंव्हा कडक होतात. बटाट्यामुळे मऊ  राहतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment