22 September 2014

साबुदाणा वडा(Sabudana Wada)

No comments :

साहीत्य:-
* साबुदाणा २ वाट्या
* मोठे उकडलेले बटाटे २ नग
* हिरव्या मिरच्या,कोथिंबीर
* जीरे
* शेंगदाण्याचा कूट २ टेबलस्पून
* वरी तांदळाचे पीठ २ टे.स्पून
* मीठ चवीनुसार
* वडे तळण्यासाठी तेल
कृती :-
प्रथम भिजवलेला साबुदाणा एका बाऊलमधे घ्यावा.त्यामधे बटाटे कुस्करून घालावेत. मिरची पेस्ट ,जीरे, शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर, वरीचे पीठ आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.

तयार मिश्राणाचे छोटे-छोटे  साधारण चपटे गोळे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे आणि खरपूस  सोनेरी रंगावर तळावेत.

भाजलेल्या दाण्याच्या कूटामधे मिठ ,लाल मिरची पूड व दही घालून केलेल्या चटणी बरोबर अथवा नारळच्या चटणीबरोबर वडे छान लागतात.

टिप:-  भिजवलेला साबुदाणा कुकरमधून एक शिट्टी काढून घेतला तर,वडे खूप हलके व खुसखूषीत होतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment