20 September 2014

पापड रोल(Papad Roll)

No comments :

साहीत्य:-
* उडीद पापड चार (लिज्जत पापड चालतात)
* उकडलेला बटाटा १ नग
* मटार १वाटी
* पनिर ५० ग्रॅम
* मीठ,साखर
* मिरची,कोथंबिर,लिंबू
* तेल
* पाणी

कृती:- 
प्रथम एका बाऊलमधे मॅश केलेला बटाटा, वाफवलेले मटार आणि पनीर घ्यावे.त्यामधे,मिठ,साखर,मिरची कोथिंबीर घालून त्यावर लिंबू पिळावे आणि नीट एकजीव करावे.

एका डिशमधे थोडे पाणी घ्यावे त्यामधे पापड उलटा पालटा भिजवून काढावा व फोल्ड होण्याइतपत मऊ झाला की,त्यावर वरील तयार सारण पसरावे व रोल करावा.

तयार रोल तेलामधे डीपफ्राय करावा.
छान कुरकूरीत पापड रोल तयार ! साँस सोबत किंवा नुसताच चहासोबत खा. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.


     

No comments :

Post a Comment