28 September 2014

खजूर-ड्रायफ्रूट्सच्या वड्या(Khajur-Dryfruit Burfi)

No comments :

साहीत्य:-
* खजूर २ कप
* काजू १/४ कप
* बदाम १/४ कप
* पिस्ता १/४ कप
* तूप २ मोठे चमचे
* खाण्याचा डींक १मोठा चमचा
* अँल्यूमिनियम फाॅइल

कृती:-
प्रथम खजूर बिया काढून साफ करून  कापून, मोठे तुकडे करून घ्यावा.

नंतर एका पॅनमधे थोडे तूप घालून कापलेला खजूर दोन मिनिट परतावा.तसेच सर्व ड्रायफ्रूट्स पण तूपावर भाजून घ्यावे.डींक तळून लाही फुलवून घ्यावी.

आता खजूर मिक्सर मधून वाटून घ्यावा. ड्रायफ्रूट्सची भरड करावी.बारीक पावडर नको
नंतर मऊ केलेल्या खजूरामधे ड्रायफ्रूटची भरड व तळलेला डींक मिसळून चांगले एकजीव करावे.व गोळा तयार करावा.

तयार गोळ्याचे आपल्याला पाहीजे त्या मापाचे रोल करावेत व अँल्यूमिनियम फाॅइलमधे गुंडाळून घट्ट होण्यासाठी फ्रीजमधे  ४-५ तास ठेवावेत.

नंतर घट्ट झालेले रोल बाहेर काढून सुरीने वड्या कापाव्यात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment