30 September 2014

नाचणी पिठाचा डोसा (Nachani Dosa)

No comments :

साहित्य ;
* नाचणी पीठ २  वाटी
* तांदूळ पीठ १ वाटी
* ओले खोबरे १/२ वाटी
* एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
* हिरवी मिरची ,आले ,लसूण  पेस्ट
* मीठ ,साखर आवडिनुसार
* कोथिंबीऱ चिरून
* दही १ वाटी
* तेल ,पाणी गरजेनुसार

कृती ;
प्रथम कांदा ,लसूण,मिरची व ओले खोबरे मिक्सरवर वाटून घ्यावे.

एका बाउल मध्ये नाचणीचे पीठ व तांदूळ  पीठ घेऊन त्यामध्ये दही. मीठ ,साखर घालून फेटावे .नंतर त्यात कोथिबीर व वरील वाटलेले मिश्रण घालून ,गरज वाटली तर थोडे पाणी घालावे .डोशाच्या पिठाइतके पातळ ठेवावे .

नंतर तवा तापत ठेवावा . तापलेल्या तव्यावर प्रथम थोडे तेल सोडावे व पळीने पीठ पसरवावे .कडेने थोडे तेल सोडावे .एक बाजू खरपूस भाजली की उलटून दुसरी बाजू भाजून घ्यावी .

अशा रीतीने भाजलेला खरपूस डोसा दही अथवा चटणी बरोबर खाण्यास द्यावा.

टीप; - आवडत असल्यास कांदा न वाटता पिठात नुसताच बारीक चिरून घालावा .

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment