04 September 2014

झटपट रवा ढोकळा(Instant Rawa Dhokala)

No comments :
साहीत्य:-
१) रवा१वाटी 
२) आंबट ताक/दही १ वाटी
३) हिरवी मिरची आले-लसूण पेस्ट
४) हळद, हिंग ,मोहरी ,तिळ ,तेल मीठ
५) कोथिंबीर ,कङीपत्ता  
६) इनो पावङर(इनो फ्रूट साॅल्ट) १/४ टीस्पून

कृती:- 
रवा एका भांङ्यामधे घेऊन त्यामधे मीठ, हळद, मिरची,आले-लसूण पेस्ट घालावी.गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेऊन,मिश्रण हलवत हलवत ताक घालावे.(दही असेल तर पाणी घालून ताक करून घ्यावे).ढोकळा स्टॅङला किवा थाळीला तेलाचा हात लावून घ्यावा व मिश्रण घालण्या आधी इनो पावडर व दोन चमचे तेल घालून चांगले हलवावे नंतर थाळीत घालावे.

कुकरला शिट्टी न लावता अथवा पातेल्यावर चाळण ठेवून दहा मिनिटे वाफवून घ्यावे.सूरी अथवा टूथपिक टोचून पहावे स्वच्छ बाहेर आले तर ढोकळा झाला असे समजावे.थंङ झाल्यावर तूकङे कापून त्यावर फोङणी करून ओतावी.

सजावटीसाठी वरून कोथिंबीर घालून हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावा.

टीप:-  इनो पावडर एकदम शेवटी, म्हणजे मिश्रण ताटलीमधे घालण्याच्यावेळी घालावे म्हणजे ढोकळा चांगला फूलतो .

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment