23 September 2014

शेंगदाण्याचा लाडू(Shengdanyacha Ladu)

No comments :
साहित्य:-
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट  १ वाटी
* चिरलेला गुळ १/२ वाटी
* वेलची पूड
* साजूक तूप १ चमचा
* ड्रायफ्रूट्स ऐच्छिक

कृति:-
कढईमधे गुळाला थोडस गरम करा. उकळू नका, विरघळन्यापुरताच गरम करा. त्यात तूप, दाण्याचा कुट, वेलची पूड टाकून व्यवस्थित एकत्र करा.
गरम असतानाच  लाडू वळा.

टीप  - बरेचवेळा काही ड्रायफ्रूट्स चे प्रकार काहीना आवडत नाहीत,(अक्रोड,पिस्ता ) तर ते शेंगदाण्याबरोबर कुटावेत.म्हणजे पोटात तर जातात पण समजत नाही.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment