साहीत्य:-
1) चिरलेला पालक दोन वाट्या
2) चना ङाल पिठ
3) तांदुळ पिठ दोन चमचे
4) रवा एक चमचा
5) गरम मसाला,मीठ मिरची लसूण आले पेस्ट
6) ओवा,तिळ,चिंच गूळ चवीनुउसार
7) तेल
कृती:-
प्रथम चिरलेला पालक एका बाऊल मधे घ्यावा.त्यामधे चना पिठ, तांदुळ पिठ,रवा व सर्व मसाला घालून नीट मिक्स करावे. आवश्यकते नुसार गोळा होण्याइतपतच पाणी घालावे व गोळा तयार करावा.
हा तयार गोळा ढोकला स्टॅडच्या प्लेटला तेलाचा हात लावून थापावा व 15 मिनीटे वाफवावा.
थंङ झाल्यावर कापून ,आवङीप्रमाणे तेलात तळाव्यात अथवा शॅलो फ्राय करावे.
तयार वड्या साॅस बरोबर खाव्यात अथवा जेवणात साईड डिश म्हणून पण खाता येतात.
No comments :
Post a Comment