22 September 2014

सुंदल (Sundal)

No comments :
सुंदल हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे.त्यांचेकडे नैवेद्यामधे हा पदार्थ करतात.पण एका दक्षिण भारतीयांच्या मंदीरात प्रसाद म्हणून मी खाल्ला व मला आवडला.तेव्हापासून मी अधून-मधून हा पदार्थ संध्याकाळच्या खाण्यासाठी करते.घरात सर्वानाच आवडते.व त्यात वाईटपण काही नाही पौष्टीक आहे.तेलकट,तिखट नाही व पोटभरीचे पण आहे.कसे केले ते पहा.
साहीत्य:-
* काबुली चणे (छोले)  दोन वाट्या
* लाल सुक्या मिरच्या २-४
* फोडणीसाठी तूप,मोहोरी, हींग, जिरे
* खोवलेला नारळ २ टेस्पून
* कढीपत्ता
* चवीपुरते मीठ

कृती:
प्रथम आठ तास भिजलेले चणे ( रात्रीच भिजत घालावेत तरी चालते) कुकरमधे शिजवून घ्यावेत. चणे चांगले शिजले पाहिजेत पण अख्खेही राहिले पाहिजेत. शिजवताना पाण्यात थोडे मीठ घालावे.

नंतर कढईत तूप गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि हींग  घालावे. त्यात मिरच्या आणि कढीपत्ता घालावा.नंतर खोबरेआणि शिजवलेले चणे घालावेत. व्यवस्थित हलवून घ्यावे व पाच मिनिट झाकून छान एक वाफ आणावी.

आता खाली उतरवून आवडत असेल तर लिंबू व  बारिक चिरलेला कांदा,कोथंबिर व बारिक चिरून मिरची पण घालू शकतो. पण मला न घालताच आवडते.

गरमच सर्व्ह करावे.

टीप:-
 *तूपाऐवजी तेल वापरले तरी चालते.
  सुंदल दक्षिण भारतात नवरात्रीदरम्यान 
  बनवतात.
*आपल्या आवडीची इतर कडधान्ये पण
  भिजवून असे करता येईल.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment