साहीत्य:-
1) मोङ आणलेले मूग, मटकी, हरभरे, प्रयेकी अर्धी वाटी
2) भिजवलेले शेगदाणे, उकङलेला एक बटाटा
3) कोथिंबीर,मिरची,लिंबू टोमॅटो व कांदा सर्व बारीक चिरून
4) मीठ, हींग,चाट मसाला
5) बारिक शेव
कृती:-
प्रथम मोङ व शेगदाणे मीठ व हींग घालून पाच मि. वाफवून(शिजवून नव्हे) घ्यावेत .सर्व कच्चेच घेतले तरी चालते.
नंतर एका बाउलमधे घेउन त्यावर चाट मसाला
लिंबू पिळावाआवङीप्रमाणे बारीक चिरलेली मिरची,टमाटा,उकङलेला बटाटा घालून सर्व व्यवस्थित हलवावे.सर्व्ह करतेवेळी वरून बारीक शेव व कोथिंबीर पेरावी.
मुलांना संध्याकाळच्या नाष्ट्याला देण्यासाठी पौष्टीक व चटपटीत असा हा पदार्थ आहे.
No comments :
Post a Comment