06 September 2014

अळू व अंबाङीचे भाजाणीचे वङे( Aloo,Ambadiche Wade )

No comments :

साहीत्य:-
१) अळू पाने धुवून बारीक चिरलेली
२) अंबाङीची भाजी
३) भाजाणीचे पीठ आवश्यकतेनुसार
४) धना-जीरा पावङर, तिखट,मीठ,हींग आवङीनुसार
५) दही दोन चमचे
६) तेल

कृती:-
प्रथम दोन्ही भाज्या वाफवून घ्या. नंतर हाताने पिळून त्यातील पाणी काढून टाकावे व त्यामधे ,घट्ट गोळा बनण्याइतपत भाजणीचे पीठ आणि वरील सर्व मसाला,दही घालून भिजवावे . हातावर चपटे वङे करून तेलात तळावेत.

हलके व खुसखूषीत असे चवदार वङे तयार होतात.

टीप:-  असेच पालक, मेथी घालून पण वङे बनतात.पण नुसत्या अळूचे किंवा अंबाङीचे चांगले लागत नाहीत .घशात खवखवते किवा आंबट लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
     

No comments :

Post a Comment