31 August 2014

कोथिंबीर वडी(Kothimbir Vadi)

No comments :
कोथिंबिरीच्या वड्या सर्वाच्याच परिचयाच्या व आवडीच्या आहेत. मी पारंपारिक जी पध्दत आहे, त्यापेक्षा थोडा बदल केला आहे. कशा केल्या साहित्य व कृती, 

साहित्य :-

* चिरलेली कोथिंबिर ४ वाट्या
* डाळीचे पीठ २ वाट्या ( घरात असेल तर  भाजाणीचे पीठ अर्धी वाटी डाळीचे दिङ वाटी घ्यावे)
* दही २ चमचे
* सोडा चिमुटभर
* तेल, तीळ,मोहरी,हींग,पाणी चवीनुसार मीठ ,हिरवी मिरची,लसूण ठेचा
* पाणी

कृती:-

प्रथम एका कढई मधे थोङे तेल गरम करून मोहरी तिळ हींगाची फोङणी करावी त्यामधे लसूण मिरची पेस्ट टाकून कोथिंबीर घालावी आणि थोङी परतावी.

नंतर थंड झाल्यावर त्यामधे पीठ, मीठ,दही,सोडा पाणी घालून भजीच्या पीठाप्रमाणे सैलसरच भिजवावे.थाळीला अथवा ढोकळा पात्राला तेलाचा हात लावून त्यामधे घालावे व दहा मिनीट वाफवावे. अथवा 

परतलेल्या कोथिंबीर मधे , एका भांड्यात डाळीचे पीठ पाणी घालून मीठ, तिखट घालून नीट पेस्ट करून ती हळू- हळू कोथिंबीरमधे ओतावी. गोळा होईपर्यंत ढवळायचे व गोळा झाला की तेल लावलेल्या ताटात थापावे.

थंड झाल्यावर वङ्या कापून आवङीप्रमाणे तळावे अथवा शॅलो फ्राय करावे.

अशा पध्दतीने केलेल्या वङ्या जास्त हलक्या व अतिशय कुरकुरीत होतात. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. 



      

No comments :

Post a Comment