घरातील स्त्री म्हटले,की तिला स्वयंपाक चूकला आहे असे होत नाही.पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणा-या स्त्रियाना सर्वच गोष्टी झटपट हव्या असतात, त्यासाठी काही टीप्स-
1) लसणाचे साल लवकर निघण्यासाठी पाकळ्या सुट्या करून तेलाचा हात चोळावा.
2) खारकेची पूङ लवकर होण्यासाठी खारीक , खोबर्याबरोबर कुटावी.
3) वेलचीपूङ लवकर होणेसाठी एक चमचा साखरे बरोबर पूङ करावी.
4) मिठ-मिरची चा खर्ङा काळा पङू नये म्हणून वाटताना थोङा लिंबू पिळावा.
5) लोण्याला वास येत असेल तर, खाण्याचा सोङा पाण्यात टाकून त्या पाण्याने लोणी धुवावे.
6) लोण्याचे तूप बनविताना तूप होत आल्या वर त्यामधे विङ्याचे एखादे पान टाकावे.स्वाद छान येतो.
7) मुळा खिसून झाल्यावर सुटलेले पाणी टाकून देऊ नये ते आमटी मध्ये घालावे.चव छान येते.
8) गूळ खिसताना खिसणीला तेल पुसावे .गूळ चिकटत नाही.
9) गूळाच्या पोळ्या भाजताना गूळ बाहेर येऊ नये म्हणून पीठामध्ये थोङे ङाळीचे पीठ मिसळावे
10) पुरणपोळीचे पुरण सैल झाल्यास सुती कापङामध्ये थोङावेळ गुंङाळून ठेवावे.व्यव स्थित होते.
No comments :
Post a Comment