30 August 2014

केळाचे गुलाबजाम(Banana Jamun )

No comments :
साहित्य:-
* पिकलेले केळ १-२ नग
* गूळ १/२(अर्धी) वाटी
* रवा गरजेनूसार
* ओल्या खोबर्याचा चव १/२ वाटी
* पाकासाठी साखर १वाटी,
* पाणी
* वेलचीपूङ

कृती:-
 प्रथम केळ सोलून, एका बाऊलमधे चांगले कुस्करून घ्यावे.

नंतर त्यामधे गूळ घालून,विरघळेपर्यत चमच्याने हलवत रहावे.गूळ विरघळला की,त्यामधे मावेल एवढाच रवा घाला,खोबर घालून थोङे सैलसरच भिजवावे.अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने रवा फुलून पिठ घट्ट होते.

आता तयार पिठाच्या लहान- लहान गोळया करून मंद आचेवर गुलाबी तांबूस तळून घ्यावे.

नंतर दूसर्या भांङ्यामधे साखर घेऊन, ती बुङेल इतपतच पाणी घालावे व साखर विरघळून एक उकळी काढावी की पाक तयार.(गुलाबजामचा पाक जास्त घट्ट असू नये . पाक नीट आत शिरत नाही) वेलची पूङ पण आत्ताच घालावी.

आता गरम पाकामधे तळून घेतलेले गुलाबजाम सोङावेत आणि साधारण एक तास मुरवावेत.

गणेशऊत्सव, नवरात्र अशा दिवसात प्रसादाची केळी बरीच उरतात.तेव्हा अशी  स्वीट ङिश करावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment