28 August 2014

काजू मोदक(Kaju Modak)

No comments :
गणपति बाप्पाच्या नैवेद्याला हमखास आपण स्वीटमार्ट मधून काजूमोदक आणतो. पण तेच जर घरीच केले तर?तर चला कसे करायचे,साहीत्य व कृती, 

साहीत्य:-

* काजू पावङर १ वाटी
* मिल्क पावङर १वाटी
* पिठी साखर १वाटी
* दूध ३/४ (पाऊण) वाटी

कृती:-
प्रथम वरील सर्व साहीत्य एका मायक्रोसेफ बाऊल मध्ये घ्यावे आणि गुठळ्या होणार नाहीत , याची काळजी घेऊन चांगले एकत्र करावे. 

नंतर 60% तापमानाला 1.50 मि. ओव्हनमध्ये ठेवावे. नंतर बाहेर काढून हलवावे व परत 1.50 मि.ठे वावे. नंतर बाहेर काढून थंङ होण्यास ठेवा.

आता मिश्रण थंङ झाल्यावर मिश्रण घट्ट होईल. मोदक साचा घेऊन त्यामध्ये हे मिश्रण भरून मोदक तयार करावेत.

पूर्वतयारी असल्यास बाप्पाच्या नैवेद्याला झटपट तयार होतात.
    
टीप:- मिश्रण ओव्हन मधून बाहेर काढल्यावर १ टेस्पून पिठीसाखर/ मिल्कपावङर घालावी.म्हणजे मिश्रण  लवकर घट्ट होते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.     

No comments :

Post a Comment