उपवासासाठी किंवा इतरवेळी लहान मुलांना डब्यात द्यायला सोईचे व पौष्टिक आहेत. तसेच झटपट तयार होतात. कसे करायचे साहित्य व कृती,
साहीत्य:-
* खजूर ४ वाट्या
* भाजलेले शेंगदाणे १ वाटी
* राजगिरा पिठ १ टेस्पून
* शिंगाङा पिठ १टेस्पून
* भाजलेले शेंगदाणे १ वाटी
* राजगिरा पिठ १ टेस्पून
* शिंगाङा पिठ १टेस्पून
कृती:-
प्रथम खजूर बिया काढून साफ करून घ्या .नंतर मिक्सर मधून भरङच वाटून घ्या , मधे मधे तूकङे दिसावेत.तसेच शेंगदाणे पण भरङ वाटून घ्यावेत.एका कढई मधे फक्त खजूर चांगला खरपूस भाजावा. कढई खाली उतरवून बाउल मधे मिश्रण काढून घ्यावे व त्यामधे शेगदाणा कूट राजगिरा पिठ , शिगाङापिठ घालावे आणि चांगले एकजीव करून ,त्याचे लहान-लहान लाङू वळावेत. वेळ नसेल तर,तेच मिश्रण एका थाळीला थापून वङ्या कापाव्यात
टिप:- जास्त गोङ आवङत असल्यास थोङी पिठीसाखर /गूळ घातला तरी चालेल.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment