गुलाबजाम हा पदार्थ सर्वांच्या परिचया आहे. गुलाबजामचे नांव काढले की च तोंडाला पाणी सुटते. एखादा घरगुती कार्यक्रम असेल तर आदले दिवशी करून ठेवण्यास सोयीचा असतो. व सर्वाना आवडता पदार्थ आहे. कसे करायचे साहीत्य व कृती,
साहित्य :-
* खवा २५० ग्रँम
* मैदा ३टेस्पून + बारीक रवा १ टेस्पून (दोन्ही मिळून १/४ कप)
* दही १/२ टेस्पून
* साखर २ वाट्या
* मैदा ३टेस्पून + बारीक रवा १ टेस्पून (दोन्ही मिळून १/४ कप)
* दही १/२ टेस्पून
* साखर २ वाट्या
* पाणी २ वाट्या
* वेलची पूड
* तेल/तूप तळणीसाठी
* खाण्याचा सोडा चिमूटभर
* वेलची पूड
* तेल/तूप तळणीसाठी
* खाण्याचा सोडा चिमूटभर
* रोज इसेन्स
कृती:-
प्रथम खवा मऊ असल्यास हातानेच मळून घ्यावा अथवा घट्ट असल्यास पुरण यंत्राभधून काढून घ्यावा.त्यामध्ये मैदा,रवा,वेलची पूड सोडा मिसळून चांगले मळून एकजीव करावे. गरज वाटल्यास थोडे
दूध शिंपङावे .
आता तयार मिश्रणाच्या लहान लहान सुपारी एवढ्या गोळ्या करून मंद आचेवर गुलाबी रंगावर तेलात तळून काढावे.
नंतर एका जाङ बुङाच्या भांङ्यामध्ये साखर व पाणी एकत्र करून पाक करून घ्यावा. साखर विरघळून एक उकळी आली की पाक झाला. ( पाक जास्त घट्ट असू नये आत शिरत नाही )
आता गँस बंद करा व त्यामधे रोज इसेन्स घाला.व तळून घेतलेले गोळे सोङा. २-३ तास चांगले मुरण्यासाठी लागतात.
टिप:- आवङत असल्यास सुका मेव्याचे तूकङे गोळे करताना मधे एक-एक घालावेत. मधे गुलकंद सुध्दा भरता येतो. जास्त चविष्ट लागतात.
गुलाबजाम पाकात सोडताना पाक गरम व गुलाबजाम गार असावेत.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment