31 August 2014

भाताचे वडे(Rice Vada)

No comments :
आपल्याकडे बर्याच वेळा भात शिल्लक रहातो. मग तो कोणी खायला तयार नसते म्हणून फोडणीला टाकतो किंवा तो संपवण्याची जवाबदारी घरातल्या स्त्री वर्गाचीच रहाते. अशावेळी खाली सांगितल्याप्माणे भजी /वडे करून टाकावेत घरातल्या सर्वांचा हातभार लागेल व भात लगेच  संपेल.
साहित्य:-
* भात १वाटी (शिळा किंवा ताजा कोणताही चालेल.वरी तांदुळाचा सुध्दा चालेल )
* ङाळीचे /ज्वारीचे पीठ (गरजेनुसार)
* तांदुळाचे पीठ१चमचा
* जीरे, हळद, आले-मिरचीची भरड पेस्ट
धणेपूड, कोथिंबीर बारीक चिरून
* चवीपुरते मीठ
* चिमुटभर सोडा
* तळण्यासाठी तेल

कृती:-

प्रथम भात जर फडफडीत असेल तर थोङे पाणी शिंपङून, वाफवून नरम करून घ्यावा.अथवा थोङेसेच मिक्सर मधून फिरवून घ्यावे . मऊ असेल हाताने मळून घ्या. 

नंतर भातात जीरे, हळद, मिरची-आले , धणेपूड, कोथिंबीर आणि मीठ व चिमूटभर सोडा घालून एकत्र करावे. तांदुळाचे पीठ घालावे आणि मळावे.

आता भातात मावेल इतके ङाळीचे पीठ घालावे व मळून घ्यावे. हाताला तेल लावून गोळा मळावा.

आता हातावरच लहान-लहान वडे थापून तेलात सोङावेत व मध्यम आचेवर तळावेत.

या वड्यांबरोबर टॉमेटो सॉस, किंवा नारळाची चटणी छान लागते.

टीप:-
हे वडे गरमच चांगले खुसखुशीत लागतात. त्यामुळे शक्यतो लगेच खावेत. गार झाले कि मऊ पडतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment